
भारत माध्यमिक कन्या शाळा व कनिष्ठ महाविद्यालयामध्ये माता पालक सभा संपन्न
साप्ताहिक सागर आदित्य
भारत माध्यमिक कन्या शाळा व कनिष्ठ महाविद्यालयामध्ये माता पालक सभा संपन्न
स्थानिक: रिसोड तालुक्यातील एकमेव उपक्रमशील मुलींची भारत माध्यमिक कन्या शाळा व कनिष्ठ महाविद्यालय रिसोड येथे माध्यमिक विभागाची इयत्ता दहावीच्या विद्यार्थिनींची माता पालक सभा 13 फेब्रुवारी 2024 रोजी संपन्न झाली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षा माननीय प्राचार्या सौ. मंजुषा सु.देशमुख मॅडम या होत्या. सुरुवातीला सर्व मान्यवरांच्या शुभहस्ते प्रतिमेचे पूजन करू कार्यक्रमाला सुरुवात केली असता. इयत्ता दहावीच्या इयतेतील सर्व वर्गशिक्षक व शिक्षिका मनोगत व मार्गदर्शन करत असताना दहावी हे विद्यार्थिनींच्या आयुष्यातले निर्णायक वर्ष आहे. सर्व पालकांनी आपल्या पाल्याची सर्वतोपरी स्वतः काळजी घ्यावी असा सूचक सल्ला आपल्या मनोगतातून शिक्षकांनी पालकांना दिला. शेवटी अध्यक्षीय मनोगतातून आदरणीय प्राचार्या सौ.मंजुषा सु. देशमुख मॅडम यानी इयत्ता दहावी मध्ये विद्यार्थिनींनी अभ्यासाबरोबर वेळेचे नियोजन करावे. तसेच या निर्णायक वेळी विद्यार्थिनींनी आपले चित्त एकाग्र ठेवून शांत आणि संयमाने परीक्षेला सामोरे जात यशाची उच्च शिखर पादाक्रांत करावी व पालकांनी आपल्या पाल्याकडे लक्ष देत असताना वेळेच्या व्यवस्थापनाकडे बघावे. तसेच विद्यार्थीनींनी, शिक्षक आणि पालक यांच्या समन्वयातून विद्यार्थ्यांची प्रगती नक्कीच होईल व बदलत्या परीक्षा पद्धती बदल पालकांनी लक्ष् द्यावे असा सूचक सल्ला आपल्या अध्यक्षीय भाषणातून दिला. या कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन विजय भाऊ हराळकर सर यांनी केले. या कार्यक्रमासाठी शिक्षक ,शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी, माता पालक आणि इयत्ता दहावीच्या सर्व विद्यार्थिनी उपस्थित होत्या.
0 Response to "भारत माध्यमिक कन्या शाळा व कनिष्ठ महाविद्यालयामध्ये माता पालक सभा संपन्न"
Post a Comment