
मौजे आसेगाव (पेन) ते कोयाळी ( बु ) गावाकडे जाताना हा आडवा येणार पूल.. कोयाळी
साप्ताहिक सागर आदित्य
मौजे आसेगाव (पेन) ते कोयाळी ( बु ) गावाकडे जाताना हा आडवा येणार पूल.. कोयाळी (बु )गावाजवळ हा आडवा येणार पूल आहे.. खरं तर पाऊसाळ्यातला पडणारा पहिलाच पाऊस एक पाऊस पडला की कंबरेइतका पाऊस या पुलावर येतो.. एकदा पाऊस पडला तर लोकांना जा येण्यासाठी प्रवास पूर्णपणे दोन चार दिवस बंद होतो,, एकदा पाऊस पडला की सात आठ दिवस शाळा कॉलेज बंद असतं, पेशंट असला तर पूल क्रॉस करून जाता येत नाही,, एकवेळ जीव जाईल पण पेशंट पुढच्या काठी जाऊ शकत नाही, अनेक शालेय विद्यार्थी, मोटार सायकल वाहने या पुरात वाहून गेल्याच्या नोंदी आहेत, ही परिस्थिती कोयाळी ( बु ) गावातील पुलाची आहे..भारत स्वातंत्र्य झाला तेव्हापासून हा पूल असाच कायम आहे.. आम्ही अजुणही पारतंत्र्यातच आहोत की काय असा प्रश्न आम्हा गाव वासियांना पडतो, खरं तर विकासाच धोरण म्हणजे सर्वप्रथम चांगले रस्ते असावे, चांगल्या सुविधा असावी पण अजूनही हे नुसतं बोलायला चांगल वाटते, लोकांचे जे हाल होतं आहेत ते असेच चालू राहले तर जनतेच्या स्वप्नातील भारत कसा बदलेल? वारंवार या पुलाची उंचीकरणाची निवेदने देऊन यावर काहीच होतं नाही आमची शासनाला आदरपूर्वक विनंती आहे की त्यांनी पुलाकडे लक्ष देऊन हा प्रश्न मार्गी लावावा,,
0 Response to "मौजे आसेगाव (पेन) ते कोयाळी ( बु ) गावाकडे जाताना हा आडवा येणार पूल.. कोयाळी "
Post a Comment