-->

योजना व उत्पन्न दाखल्यासाठी  कागदपत्रे त्वरील सादर करावी

योजना व उत्पन्न दाखल्यासाठी कागदपत्रे त्वरील सादर करावी

 


साप्ताहिक सागर आदित्य 

योजना व उत्पन्न दाखल्यासाठी

कागदपत्रे त्वरील सादर करावी

       वाशिम, : संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्ती वेतन योजना या विशेष सहाय्य योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना अनुदान वितरीत करण्यात येते. या योजनेचा लाभ घेणाऱ्या पात्र लाभार्थ्यांना शासन निर्णयानुसार माहे एप्रिल ते जून या कालावधीत उत्पन्नाचा दाखला सादर करावा लागतो. त्यानुसार या योजनांचा लाभ घेणाऱ्या संबंधित पात्र लाभार्थ्यांकडून अद्यापपर्यंत 50 टक्केच उत्पन्नाचे दाखले प्राप्त झाले आहेत. तरी लाभार्थ्यांनी आपला उत्पनाचा दाखला संजय गांधी योजना शाखा, तहसिल कार्यालय, वाशिम येथे तात्काळ सादर करावा. अन्यथा योजनेचा लाभ घेणाऱ्या पात्र लाभार्थ्यांचे अर्थसहाय्य बंद करण्यात येईल. ज्या तारखेला आपण उत्पन्नाचा दाखला सादर केला त्या तारखेपासून लाभार्थ्यांचे अर्थसहाय्य सुरु करण्यात येईल. असे तहसिलदार, वाशिम यांनी कळविले आहे.


                                                                                                                                          

Related Posts

0 Response to "योजना व उत्पन्न दाखल्यासाठी कागदपत्रे त्वरील सादर करावी"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article