
मालेगाव तालुक्यातील मौजे मुठ्ठा गावा नजीक असणारा हा पूल, गेली अनेक वर्ष
साप्ताहिक सागर आदित्य
मालेगाव तालुक्यातील मौजे मुठ्ठा गावा नजीक असणारा हा पूल, गेली अनेक वर्ष पूल उंचीकरणाची मागणी सर्व ग्रामस्थ यांनी वारंवार केली असून अद्याप यावर कोणताही निर्णय लागलेला नाही, तरी सर्व ग्रामस्थ हा पूल लवकर व्हावा यासाठी शासनाकडे आशेने बघताहेत, शिरसाळा, सोमठाणा, ताकतोडा, दापुरी यांना मालेगाव कडे जातांना हा मुठ्ठा गावामध्ये हा पूल लागतो, हा पूल पार करून प्रवाशांना पुढे जावे लागते, परंतु हे काम कित्येक वर्षे झाले असेच आहे, अनेक गावानजिक विद्यार्थ्यांना मालेगाव तालुक्याच्या ठिकाणी जावे लागते,परंतु मुसळधार पाण्याच्या ह्या थैमाणामुळे वाहने जागची जागीच आहे, एकदा पाऊस पडल्यावर दोन चार दिवस वाहने जागची जागीच असताना दृश्य पहावयास मिळत असताना लोकांचा प्रवास जागच्या जागी बसलेला आहे,तरी प्रशासनाणे यावर लवकरात लवकर तोडगा काढावा ,, ही समस्त मुठ्ठा ग्रामवासियांकडून सामाजिक कार्यकर्ते गोपाल पाटील भिसडे यांनी प्रशासनाला नम्र विनंती मागणी केली ,,
0 Response to "मालेगाव तालुक्यातील मौजे मुठ्ठा गावा नजीक असणारा हा पूल, गेली अनेक वर्ष"
Post a Comment