भारत प्राथमिक शाळेत बालदिन उत्साहात साजरा
साप्ताहिक सागर आदित्य
भारत प्राथमिक शाळेत बालदिन उत्साहात साजरा
रिसोड : येथील भारत प्राथमिक मराठी शाळेत 14 नोव्हेंबर रोजी बालदिन उत्साहात साजरा करण्यात आला.सर्वप्रथम मुख्याध्यापिका किरण ताई दुबे यांनी पंडीत जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेचे पूजन केले बालदिनाच्या शुभेच्छा देताना किरण ताई दुबे म्हणाल्या की "पंडित जवाहरलाल नेहरू यांचे मुलांवर खूप प्रेम होते. देश स्वतंत्र झाल्यानंतर पंडित नेहरु यांनी मुलांचे हक्क, आरोग्य आणि शिक्षण यासाठी काम केले. बाल दिन या दिवसाचा उद्देश मुलांच्या चांगल्या संगोपनाला चालना देणे, लोकांना मुलांचे हक्क आणि शिक्षणाबद्दल जागरूक करणे आहे." यावेळी विद्यार्थी गुलाब घेऊन चाचा नेहरूंच्या वेशभूषेत पेहराव करत शाळेमध्ये आले होते. त्याच बरोबर सर्व विद्यार्थ्यांनी गाण्याच्या ठेक्यावर नृत्य करत आपला आनंद व्यक्त केला. याप्रसंगी विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले. प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ शिक्षक पंजाबराव देशमुख ज्योती दुबे आदी मान्यवर उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका मोनिका मगर यांनी केले.
0 Response to "भारत प्राथमिक शाळेत बालदिन उत्साहात साजरा"
Post a Comment