
अनसिंग येथे साजरी करण्यात आली लोकनेते स्व गोपीनाथजी मुंढे यांची जयंती
साप्ताहिक सागर आदित्य/
!! अनसिंग येथे साजरी करण्यात आली लोकनेते स्व गोपीनाथजी मुंढे यांची जयंती !!
प्रतिनिधी/अनसिंग
भारत आंधळे
दिनांक 12 डिसेंबर 2024 रोजी लोकनेते केंद्रीय ग्रामविकामंत्री स्व गोपीनाथजी मुंढे यांची 75 वी जयंती साजरी करण्यात आली.सर्वप्रथम लोकनेते मुंढे यांच्या प्रतिमेला हार घालून सर्व मंडळींनी प्रतिमेचे पूजन केले व पुढे कार्यक्रमाला सुरवात करण्यात आली या या कार्यक्रमाला गावातील बहुसंख्य महिला व पुरुष मंडळी सुद्धा हजर होते या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून हनुमानराव आंधळे हे होते तर सूत्र संचालन विकास आंधळे यांनी केले. व अनसिंग येथील माजी सरपंच कैलासराव आंधळे यांनी सर्वांना लोकनेते स्व गोपीनाथजी मुंढे यांच्या सामाजिक व राजकीय कार्याबद्दल माहिती दिली की मुंढे केवळ वंजारी समाजाचेच लोकनेते नसून पूर्ण महाराष्ट्रातील जनतेचे लोकनेते होते त्यानी कोणत्याच समाजाचा भेदभाव केला केला नाही. कार्यक्रमासाठी गावातील माजी सरपंच विक्रमराव आंधळे ,राजकुमार आंधळे प्रकाशराव आंधळे , शंकरराव आंधळे, भीमराव शिंदे, रामदास आंधळे,सुरेशराव आंधळे,नवनाथ आंधळे, सुभाषराव आंधळे,मारोती आंधळे,महादेव आंधळे,महादेव करवते,मारोती घोळवे,रामभाऊ घोळवे,रामभाऊ सावळे,अशोक कहाळे पांडुरंग आंधळे,गजानन म आंधळे, संतोष आंधळे,विष्णू आंधळे व इतर महिला मंडळी सुद्धा हजर होती.कार्यक्रमाचे आयोजन लोकनेते प्रतिष्ठान व गावकरी मंडळी अनसिंग यांच्या कडून करण्यात आले होते आभार प्रदर्शन विष्णू धळे यांनी केले व कार्यक्रम संपल्या नंतर लगेच सर्वांना प्रसादाचे वाटप करण्यात आले
0 Response to "अनसिंग येथे साजरी करण्यात आली लोकनेते स्व गोपीनाथजी मुंढे यांची जयंती"
Post a Comment