-->

नायलॉन मांजाचा वापर टाळा !

नायलॉन मांजाचा वापर टाळा !

 


साप्ताहिक सागर आदित्य/

नायलॉन मांजाचा वापर टाळा !  नायलॉन मांजा हा लवकर तुटत नसल्याने तो झाडे , विजेच्या तारा यांमध्ये अडकून राहतो . नायलॉन असल्याने त्याचे लवकर विघटन होत नाही . हा मांजा बारीक असल्याने सहजासहजी लवकर दिसत नाही . यामुळे पक्षी उडताना त्यांच्या पंखात हा मांजा अडकला जाऊन त्यांचे पंख कापले जातात यामुळे हजारो पक्षी दरवर्षी मृत्युमुखी पडत असून यातून पर्यावरणातील जैव साखळीचा मोठे नुकसान होत आहे . तसेच कटलेल्या पतंगाचा मांजा रस्त्यावर आडवा आला कि वाहनचालकांना तो दिसत नसल्याने त्यापासून गळा , हात कापले जाण्याची शक्यता असते . असे प्रकार सातत्याने घडत आहेत . व ते अनेकांच्या जीवावर बेतले आहेत . तसेच ह्या मांजा मुळे अनेकदा वीजवाहक तारा तुटून त्यापासून मोठा धोका संभवत असतो त्यामुळे आपण ह्या मांजाचा वापर टाळावा .

- संपादक साप्ताहिक सागर आदित्य

प्रकाश पाटील लहाने





0 Response to "नायलॉन मांजाचा वापर टाळा !"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article