-->

बुस्टर डोस साठी कॉल आल्यास सावधान !

बुस्टर डोस साठी कॉल आल्यास सावधान !

 


साप्ताहिक सागर आदित्य/

बुस्टर डोस साठी कॉल आल्यास सावधान ! 

वाशिम - ओटीपीची मागणी करून खात्यातील रक्कम होऊ शकते चोरी  मोबाईल वर एक ओटीपी येतो . आणि लगेच एक कॉल येतो व त्यावर आपल्याला ओटीपी ची मागणी केली जाते आणि ओटीपी देताच आपल्या खात्यातील रक्कम ऑनलाइन चोरी केली जाते . शासनाने केलेल्या घोषणांचा सायबर गुन्हेगारीतील सक्रिय असलेल्या काही भामट्यांनी फ्री बूस्टर डोस व्हॅक्सिनेशन करीता टेलिफोन कॉल करून बूस्टर डोससाठी आमिष दाखविण्याचे काम सुरू केले आहे . नागरिकांनी अशा फसवणुकीला बळी न पडता सावधगिरी बाळगण्याचे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांनी केले आहे . बनावट कॉलद्वारे लसीकरणाची माहिती घेवून बुस्टर डोस घेतला का अशी विचारणा केली नागरिकांनी कुठल्याही आमिषाला बळी पडून नये , आपल्या मोबाईलवर आलेल्या ओटीपी ला शेअर करू नये ऑनलाइन फसवणूक झाल्यास सकाळी १० ते सांयकाळी ०६ पर्यंत १५५२६० या हेल्पलाइन नंबर वर कॉल करून तक्रार करण्याचे आवाहन वाशिम जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांनी केले आहे .





Related Posts

0 Response to "बुस्टर डोस साठी कॉल आल्यास सावधान ! "

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article