-->

वसंतराव नाईक विद्यालय मानोरा येथे राजमाता जिजाऊ साहेब यांना अभिवादन

वसंतराव नाईक विद्यालय मानोरा येथे राजमाता जिजाऊ साहेब यांना अभिवादन


साप्ताहिक सागर आदित्य/

वसंतराव नाईक विद्यालय मानोरा येथे राजमाता जिजाऊ साहेब यांना अभिवादन

मानोरा : स्थानिक वसंतराव नाईक विद्यालया मध्ये "राजमाता जिजाऊ साहेब यांच्या जयंती निमित्त अभिवादन कार्यक्रम ऑनलाईन पद्धतीने आयोजित केला असता कार्यक्रमाचे सुरुवातीला शाळेचे मुख्याध्यापक  प्रसेन भगत जिजाऊ माँ साहेब यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले. प्रमुख अतिथी शाळेचे सेवानिवृत्त कर्मचारी  रामराव पाटील यांनी ' जिजाऊ वंदन' गीत गाऊन अभिवादन केले. शाळेचे बहुतांश विद्यार्थी कार्यक्रमास ऑनलाईन उपस्थित होते त्या पैकी चेतन चव्हाण आणि कू आयूषी मनवर यांनी जिजाऊ माँ साहेब यांच्या जीवनावर विचार व्यक्त केले त्याच प्रमाणे शाळेच्या विज्ञान शिक्षिका सोळंके मॅडम , चातूरकर मॅडम , इंगोले मॅडम  राठोड सर यांनी सुद्धा आपले विचार मांडले.  भगत सर यांच्या अध्यक्षीय भाषणा नंतर  खडसे सर यांनी आभार प्रदर्शन केले या कार्यक्रमाला शाळेचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

0 Response to "वसंतराव नाईक विद्यालय मानोरा येथे राजमाता जिजाऊ साहेब यांना अभिवादन"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article