-->

अखिल भारतीय योग शिक्षक महासंघाचे आमदार लखन मलिक यांना निवेदन

अखिल भारतीय योग शिक्षक महासंघाचे आमदार लखन मलिक यांना निवेदन

 

साप्ताहिक सागर आदित्य/

वाशिम  - अखिल भारतीय योग शिक्षक महासंघ वाशिम जिल्हा  अध्यक्ष राजेश पाटील सिरसाट व सचिव दत्तात्रय भिसडे व सर्व योगशिक्षक,योग साधक  यांनी 11 सुत्रिय मागणी पत्र आमदार लखन मलिक यांना निवेदन सादर केले
अ.भा.यो. शि महासंघाच्या योगशिक्षक हिताच्या ११ मागण्या मान्य करण्यास विनंती बाबत सदृढ ठेवण्यासाठी महोदय , समाजाला आणि देशाला स्वास्थ बनविण्यासाठी योगसाधनेशिवाय पर्याय नाही . म्हणून अ.भा.यो. शि महासंघाच्या वतीने योग संपूर्ण देशात योगसाधनेबाबत जनजागृती सोबत समाजाला स्वास्थ आणि योगशिक्षक अहोरात्र झटत आहे . मात्र आजपर्यंत योगशिक्षकांच्या पदरी निराशाच पडली आहे. म्हणून आम्ही शासन दरबारी योगशिक्षकांच्या ११ मांडल्या आहेत.

१ ) एम.पी.एस.सी. ( MPSC ) मध्ये योगविषयाला ऐच्छिक विषय म्हणून मान्यता द्यावी . 

२ ) शाळा व महाविद्यालयात योग विषयास मुख्य विषय म्हणून मान्यता . 

३ ) महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात आरोग्यवर्धिनी मार्फत योगसत्र आणि शिक्षकास नियमित करावे तथा मानधन वाढवून द्यावे . 

४ ) शासकीय व निमशासकीय आस्थापना मध्ये योगा ब्रेक नियमित करावा यासाठी एक तज्ज्ञ योग शिक्षक नेमावा .

 ५ ) योग विषयास सेट ( SET ) परीक्षेत सामील करावे .

 ६ ) महाराष्ट्र पोलीस खात्यात योग शिक्षक नियमित करावा . 

७ ) जिल्हा सामान्य रुग्णालयात योग थेरेपिस्टच्या जागा भराव्यात 

८ ) ग्रामीण तथा शहरी भागातील २० वर्षांपासून निःशुल्क सेवा देणाऱ्या योगशिक्षकास लोककलावंता प्रमाणे मानधन द्यावे.

 ९ ) योग विषयाला पूर्णतः अनुदानित करावे. 

१० ) योग विषयात उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यास फेलोशिप प्रदान करावी . 

११ ) मराठी साहित्य संमेलन प्रमाणे दरवर्षी योग संमेलनचे शासनाने आयोजन करावे अथवा त्याकरिता संघटनेस अनुदान देण्यात यावे. 

अशा सर्व मागण्या मान्य कराव्या व योगशिक्षकांना उचित न्याय द्यावा.  ह्या सर्व मागण्या त्वरित मान्य न झाल्यास संघटनेतर्फे प्रखर आंदोलनाचा इशारा देण्यात आला.


0 Response to "अखिल भारतीय योग शिक्षक महासंघाचे आमदार लखन मलिक यांना निवेदन "

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article