-->

देशभरातील डॉक्टरांच्या हक्क आणि अधिकाराच्या लढ्याला यश - डॉ. माधव हिवाळे

देशभरातील डॉक्टरांच्या हक्क आणि अधिकाराच्या लढ्याला यश - डॉ. माधव हिवाळे

 


साप्ताहिक सागर आदित्य 

देशभरातील डॉक्टरांच्या हक्क आणि अधिकाराच्या लढ्याला यश - डॉ. माधव हिवाळे

अल्टरनेटीव्ह मेडीसीन डॉक्टर्स असोसिएशनचा स्नेहमिलन सोहळा जालना येथे उत्साहात

वैद्यकीय क्षेत्रात कार्य करणार्‍या डॉक्टरांचा सत्कार

वाशीम - देशभरातील सहयोगी डॉक्टरांच्या हक्क आणि अधिकारासाठी कार्यरत अल्टरनेटीव्ह मेडीसीन डॉक्टर्स असोसिएशनचा स्नेहमिलन सोहळा मंगळवार, ११ जुन रोजी जालना येथील शिवनेरी पॅलेसमध्ये मोठ्या थाटामाटात व उत्साहात पार पडला. या बैठकीत राष्ट्रीय व महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणीची निवड करण्यात आली.

बैठकीच्या अध्यक्षस्थानी असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. माधव हिवाळे हे होते. तर प्रमुख पाहूणे म्हणून डॉ. रमेश लबडे, डॉ. टिना राठोड, डॉ. प्रकाश माळी, डॉ. शब्बीर शेख, डॉ. सुभाष सिरसाट, डॉ. संदीप राठोड, डॉ. सचिन राठोड, डॉ. गजानन बाजड आदींची उपस्थिती होती.

प्रारंभी महापुरुषांच्या प्रतिमेचे पुजन व हारार्पण करण्यात आले. प्रास्ताविकातुन डॉ. रमेश लबडे यांनी असोसिएशनच्या मागील एक वर्षाच्या कार्याची माहिती दिली. यासोबतच राज्यातील सहयोगी डॉक्टरांवर झालेल्या अन्यायाची असोसिएशनचे वेळीच दखल घेवून त्यांना वेळोवेळी न्याय दिला असल्याचे नमूद केले. 

बैठकीत पुढीलप्रमाणे कार्यकारणीची निवड करण्यात आली. त्यामध्ये राष्ट्रीय सचिवपदी डॉ. रमेश लबडे, राष्ट्रीय उपाध्यक्षपदी डॉ. प्रकाश माळी, राष्ट्रीय महासचिवपदी डॉ. संतोष गायकवाड, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी डॉ. राहुल नेटके, प्रदेश उपाध्यक्षपदी डॉ. सचिन राठोड, प्रदेश सचिवपदी डॉ. संदीप राठोड, प्रदेश युवा अध्यक्षपदी डॉ. गजानन बाजड, जालना जिल्हाध्यक्षपदी डॉ. विनोद जाधव, उपाध्यक्षपदी डॉ. वसिम खान, सचिवपदी डॉ. गजानन मगरे, कार्याध्यक्षपदी डॉ. भास्कर धुमाळ, बुलढाणा महिला जिल्हाध्यक्षपदी डॉ. निकिता भलभले, जिल्हा उपाध्यक्षपदी डॉ. तृप्ती काटेकर, जिल्हा सचिवपदी डॉ. अर्चना भोपळे आदींची निवड करुन त्यांना निवडीचे पत्र देण्यात आले.

अध्यक्षीय मनोगतात बोलतांना डॉ. माधव हिवाळे म्हणाले की, अल्टरनेटीव्ह मेडीसीन डॉक्टर्स असोसिएशनने स्थापनेपासूनच देशभरातील डॉक्टरांच्या अधिकारासाठी मोठा लढा उभारला असून असोसिएशन नेहमीच डॉक्टरांच्या पाठीशी ठामपणे उभी राहीली आहे. ग्रामीण डॉक्टर्स बांधव अतीदुर्गम भागात कोणत्याही प्रकारच्या सुखसोई नसतांना रात्री अपरात्री रुग्णांना घरपोच सेवा देतात. पण त्यांना कोणीही मानाचे स्थान देत नाही. या ग्रामीण डॉक्टरांना असामाजीक घटकांकडून संरक्षण आणि शासनाकडून सन्मानाचे स्थान देण्यासाठी असोसिएशन गेल्या अनेक वर्षापासून संघर्षरत आहे. अनेक अन्यायग्रस्त डॉक्टरांसाठी असोसिएशनने न्यायालयात कायदेशीर लढा देवून त्यांना न्याय मिळवून दिला आहे. सर्व पदाधिकारी व सदस्यांनी एकजुटीने व एकदिलाने कार्य करुन सहयोगी डॉक्टरांच्या हक्क आणि अधिकारासाठी कार्यरत रहावे असे आवाहन डॉ. हिवाळे यांनी केले. यासोबतच असोसिएशनच्या या वर्षीच्या विशेष योजना, उपचार करतांना घ्यावयाची काळजी यावर मार्गदर्शन केले. यावेळी वैद्यकीय क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणार्या डॉक्टरांचा पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. संतोष गायकवाड यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. गजानन गायकवाड यांनी केले. बैठकीला राज्यातील असोसिएशनचे सर्व सदस्य डॉक्टर्स उपस्थित होते.

0 Response to "देशभरातील डॉक्टरांच्या हक्क आणि अधिकाराच्या लढ्याला यश - डॉ. माधव हिवाळे"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article