
जिल्हाधिकारी(परिविक्षादीन) श्रीमती मिन्नू पि.एम.(भा.प्र.से.) यांनी स्काऊटच्या विद्यार्थ्यांशी साधला संवाद
साप्ताहिक सागर आदित्य
जिल्हाधिकारी(परिविक्षादीन) श्रीमती मिन्नू पि.एम.(भा.प्र.से.) यांनी स्काऊटच्या विद्यार्थ्यांशी साधला संवाद
आमखेडा:- येथील कर्मयोगी बाबारावजी जोगदंड कृषी महाविद्यालय येथे डाॅ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अंतर्गत आंतरमहाविद्यालयीन कबड्डी स्पर्धा(पुरूष)आयोजित करण्यात आली होती.
यावेळी शेवटच्या दिवशी अंतिम सामना हा पी.जी.आय. अकोला विरूद्ध पिंपळखुटा कृषी महाविद्यालयाच्या दरम्यान झाला.यामध्ये पि.जी.आय.संघ हा विजेतेपद पटकावून प्रथम बक्षीसाचा मानकरी ठरला.या बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमाच्या वेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष गीताई ह्युमॅन काइंड ट्रस्ट चे अध्यक्ष अविनाश जोगदंड, संचालक घनश्याम जोगदंड डॉ. संतोष जोगदंड,सुर्यभान पाटिल जोगदंड तसेच प्रमुख पाहुणे म्हणून वाशिम जिल्ह्याच्या परीविक्षादीन जिल्हाधिकारी श्रीमती मिन्नू पि.एम.(भा.प्र.से.) मॅडम ह्या उपस्थित होत्या.
*यावेळी स्काऊटच्या सर्व विद्यार्थ्यांनी सरस्वती अॅग्रोटेक मध्ये शिवार फेरीचा आनंद घेतला व विविध जैविक, वनौषधी, सौर ऊर्जा,बायोगॅस प्रकल्प व भातशेती इ.चे प्रात्यक्षिकासह माहिती घेतली.
यावेळी श्री.पांडुरंग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील नेताजी सुभाष चंद्र बोस स्काऊट युनिट तसेच छत्रपती शिवाजी महाराज युनिट ने विविध प्रकारच्या स्काऊटच्या टाळ्या वाजवून उपस्थितांची मने जिंकली आणि यावेळी परीविक्षादीन जिल्हाधिकारी मॅडम यांनी विशेष बाब म्हणून स्काऊटच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी स्काऊटच्या सर्व विद्यार्थ्यांची व मुलींची चौकशी करून त्यांना जीवनामध्ये काय बनायचे आहे याबद्दलची आस्थेवाईक विचारपूस केली व विद्यार्थांनी उच्च शिक्षण घेऊन जीवनामध्ये आपलं नाव उज्वल करावे.अशा प्रकारची शुभकामना व शुभेच्छा देऊन विद्यार्थ्यांचा गौरव केला.
यावेळी विद्यालयातील स्काऊट मास्टर
एन.डी.भिंगे , सहाय्यक शिक्षक जी.डी.कोरडे व बी.ई.गवळी,व कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य जाधव सर व प्राध्यापक वर्ग उपस्थित होते.
0 Response to "जिल्हाधिकारी(परिविक्षादीन) श्रीमती मिन्नू पि.एम.(भा.प्र.से.) यांनी स्काऊटच्या विद्यार्थ्यांशी साधला संवाद "
Post a Comment