-->

जिल्हाधिकाऱ्यांकडून ‘कॅच द रेन’ मोहिमेचा आढावा  वाशिम राज्यात पहिल्या क्रमांकावर

जिल्हाधिकाऱ्यांकडून ‘कॅच द रेन’ मोहिमेचा आढावा वाशिम राज्यात पहिल्या क्रमांकावर

 


साप्ताहिक सागर आदित्य 

जिल्हाधिकाऱ्यांकडून ‘कॅच द रेन’ मोहिमेचा आढावा

वाशिम राज्यात पहिल्या क्रमांकावर

       वाशिम,  : केंद्र शासन पुरस्कृत जलशक्ती अभियानातंर्गत ‘कॅच द रेन’ मोहिमेचा आढावा आज 1 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटक सभागृहात जिल्हाधिकारी षन्मुगराजन एस. यांनी घेतला. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत, जिल्हा जलसंधारण अधिकारी सुभाष आकोसकर, लक्ष्मण मापारी, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता  वानखेडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत)  लोखंडे व जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार यांची प्रमुख उपस्थिती होती

          ‘कॅच द रेन’ मोहिमेअंतर्गत चार विविध प्रकारच्या बाबीतून 11 हजार 275 कामे आणि 5 लाख 80 हजार 806 वृक्षलागवडीची कामे अशी एकूण 5 लाख 92 हजार 81 कामे करण्यात आली आहे. ‘कॅच द रेन’ मोहिमेअंतर्गत करण्यात येणाऱ्या कामात वाशिम जिल्हा राज्यात प्रथम क्रमांकावर असल्याची माहिती श्री. आकोसकर यांनी यावेळी दिली.

         षन्मुगराजन म्हणाले, भूजल सर्व्हेक्षण आणि विकास यंत्रणेच्या माध्यमातून करण्यात आलेल्या रिचार्ज शाफ्टच्या कामाच्या ठिकाणी नदी आणि नाल्याच्या काठावरील दोन्ही बाजूला बांबूची लागवड करण्यात यावी. वृक्ष लागवडीसाठी सामाजिक वनीकरण विभागाने मागील वर्षीप्रमाणे यावर्षी  सुध्दा वृक्ष लागवडीसाठी झाडे उपलब्ध करुन द्यावीत. विभागांनी वृक्ष लागवडीच्या कामाला सुरुवात करुन वृक्ष लागवडीसोबतच संगोपनाकडे विशेष लक्ष द्यावे. ज्या विभागांना वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट दिले आहे ते लागवडीतून पुर्ण करावे. ‘कॅच द रेन’ मोहिमेअंतर्गत करण्यात येणारी कामे निर्धारीत वेळेत पूर्ण करुन फोटो व कामांची माहिती संबंधित पोर्टलवर अपलोड करावी. असे त्यांनी सांगितले.

        श्रीमती पंत म्हणाल्या, जिल्हा परिषदेच्या ज्या विभागांमार्फत या मोहिमेअंतर्गत कामे करण्यात येत आहे. ती कामे नियोजनबध्द पध्दतीने करुन दिलेले उद्दिष्ट यंत्रणांनी पुर्ण करावे. वृक्ष लागवडीसह, शोषखड्डे, छतावरील पडणाऱ्या पाऊसाच्या पाण्याचे भूगर्भात साठवणूकीची कामे यासह इतरही जलसंधारणाची कामे चांगल्या प्रकारे करण्यात यावी, असे त्या म्हणाल्या. यावेळी संबंधित यंत्रणेमार्फत करण्यात आलेल्या आणि करण्यात येणाऱ्या कामाची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली.

        सभेला सर्व गट विकास अधिकारी, सर्व नगर पालीका व नगर पचायतींचे मुख्याधिकारी, सर्व तालुका कृषी अधिकारी, यंत्रणांचे प्रमुख व त्यांचे प्रतिनिधी यांची उपस्थिती होती. 


                                                                                                                                           

Related Posts

0 Response to "जिल्हाधिकाऱ्यांकडून ‘कॅच द रेन’ मोहिमेचा आढावा वाशिम राज्यात पहिल्या क्रमांकावर"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article