
8 ऑक्टोबर रोजी परीक्षा केंद्राच्या 100 मिटर परिसरात कलम 144 लागू
साप्ताहिक सागर आदित्य
8 ऑक्टोबर रोजी परीक्षा केंद्राच्या
100 मिटर परिसरात कलम 144 लागू
वाशिम, : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्तपूर्व परीक्षा-2022 वाशिम शहरातील 15 परीक्षा केंद्रावर 8 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 ते दुपारी 12 या वेळेत घेण्यात येणार आहे. परीक्षेच्या दिवशी परीक्षा केंद्राच्या 100 मिटर परिक्षेत्रात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये तसेच परीक्षेसंबंधीचे गैरप्रकार घडू नये म्हणून फौजदारी दंड प्रक्रीया संहिता 1973 चे कलम 144 लागू राहील.
ही परीक्षा वाशिम येथील राजस्थान महाविद्यालय, माऊंड कारमेल इंग्लिश स्कूल, श्री शिवाजी विद्यालय, श्री. तुळशिरामजी जाधव महाविद्यालय, सन्मती इंजिनियरींग कॉलेज, एसएमसी इंग्लिश स्कुल, हॅपी फेसेस हायस्कुल-1, हॅपी फेसेस हायस्कुल-2, श्री बाकलीवाल विद्यालय, राणी लक्ष्मीबाई कन्या शाळा, रेखाताई कन्या शाळा, शासकीय तंत्रनिकेतन, मातोश्री शांताबाई गोटे कॉलेज, श्रीमती मालतीबाई सरनाईक कन्या शाळा आणि जवाहर नवोदय विद्यालय या परीक्षा केंद्रावर घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी 15 शाळांच्या 221 खोल्या अधिग्रहीत करण्यात आल्या असून 5304 परीक्षार्थी ही परीक्षा देणार आहे.
परीक्षा केंद्राच्या परिसरात 8 ऑक्टोबर रोजी कलम 144 चे आदेश लागू राहणार असल्यामुळे परीक्षा उपकेंद्रावर ओळखपत्राशिवाय प्रवेश मिळणार नाही. 100 मिटर परिक्षेत्रात केंद्राधिकारी, उपकेंद्र प्रमुख, पर्यवेक्षक, समवेक्षक, सहाय्यक कर्मचारी, परीक्षार्थी परीक्षेसाठी नियुक्त समन्वय अधिकारी आणि जिल्हाधिकारी यांचेकडून नियुक्त केलेले अधिकारी/कर्मचारी सोडून इतर व्यक्तींना प्रवेशास मनाई राहील. परिक्षा उपकेंद्रावर 100 मिटरच्या आत रस्त्यावरुन वाहने नेण्यास मनाई राहील. परीक्षा केंद्रातील 100 मिटर परिसरातील सर्व सार्वजनिक टेलीफोन, एसटीडी, आयएसडी, झेरॉक्स, फॅक्स, ई-मेल व ध्वनीक्षेपके इत्यादी सुविधांवर प्रतिबंध राहील. तसेच या उपकेंद्रावर मोबाईल फोन, वायरलेस सेट, रेडिओ, दूरदर्शन, कॅलक्युलेटर व संगणक वापरण्यावर बंदी राहील. उपकेंद्राच्या परिसरात प्रवेश करतेवेळी चारपेक्षा जास्त व्यक्ती प्रवेश करणार नाही. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुध्द कायदेशीर कारवाई करण्यात येईल. हा आदेश 8 ऑक्टोबर रोजी सकाळी 8 वाजतापासून ते दुपारी 2 वाजतापर्यंत लागू राहील. असे जिल्हादंडाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी कळविले आहे.
0 Response to " 8 ऑक्टोबर रोजी परीक्षा केंद्राच्या 100 मिटर परिसरात कलम 144 लागू"
Post a Comment