
जि.प.अध्यक्ष व पं.स.सभापती पदासाठी आरक्षण काढण्यासाठी सभेचे आयोजन
साप्ताहिक सागर आदित्य
जि.प.अध्यक्ष व पं.स.सभापती पदासाठी
आरक्षण काढण्यासाठी सभेचे आयोजन
वाशिम, : जिल्हयातील सर्व सहा पंचायत समितीच्या सभापती पदाचे आरक्षण निश्चित करण्यासाठी 7 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवन सभागृह येथे जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांच्या अध्यक्षतेखाली पंचायत समिती सभापती पदाचे आरक्षण निश्चित करण्याबाबत सभेचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हयातील नागरीकांनी 7 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या पंचायत समिती सभापती पदाच्या आरक्षण सोडत सभेसाठी उपस्थित राहण्याबाबतचे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.
जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडणूकीची विशेष सभा ही पिठासीन अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी, वाशिम यांच्या अध्यक्षतेखाली 14 ऑक्टोबर 2022 रोजी जिल्हा परिषद, वाशिम येथील सभागृहात आयोजित करण्यात आली असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाने कळविले आहे.
0 Response to "जि.प.अध्यक्ष व पं.स.सभापती पदासाठी आरक्षण काढण्यासाठी सभेचे आयोजन"
Post a Comment