-->

जागतिक एड्स दिनानिमीत्त  1 डिसेंबरला वाशिम शहरात रॅली

जागतिक एड्स दिनानिमीत्त 1 डिसेंबरला वाशिम शहरात रॅली

 

साप्ताहिक सागर आदित्य 

जागतिक एड्स दिनानिमीत्त

1 डिसेंबरला वाशिम शहरात रॅली

       वाशिम,  : महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था, मुंबई अंतर्गत जिल्हा रुग्णालय वाशिम यांच्या संयुक्त विदयमानें Equalize " "आपली एकता आपली समानता एचआयव्हीसह जगणाऱ्यांकरीता " या वर्षांचे घोषवाक्य आहे.  1 डिसेंबर रोजी सकाळी ८.३० वाजता जागतिक एड्स दिनानिमीत्त रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या रॅलीच्या माध्यमातून वाशिम शहरातून एच आय व्ही/ एडस या विषयावर माहिती देवून तसेच जनजागरणपर गिते व पथनाटयांच्या माध्यमातून जाणीव जागृती करण्यात येणार आहे.

         या रॅलीचा शुभारंभ जिल्हा सामान्य रुग्णालयातुन होणार आहे. कार्यक्रमाला विविध विभागातील अधिकारी यांचेसह वरिष्ठ व कनिष्ठ महाविदयालयातील प्राचार्य व प्राध्यापक वर्ग आणि मोठया संख्येने विद्यार्थ्यांची उपस्थिती राहणार आहे. या रॅलीला जास्तीत जास्त महाविदयालये, सामाजिक कार्यकर्ते, सामाजिक संघटना तसेच विविध क्षेत्रातील व्यक्तींनी व नागरीकांनी उपस्थित राहावे. असे आवाहन जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. विजय काळबांडे यांनी केले आहे. रॅलीची सुरुवात जिल्हा सामान्य रुग्णालयापासून-पाटणी चौक- डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक- बस स्टँड मार्गे जिल्हा क्रीडा संकुल येथे पोहोचून रॅलीचा समारोप होईल.



Related Posts

0 Response to "जागतिक एड्स दिनानिमीत्त 1 डिसेंबरला वाशिम शहरात रॅली"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article