-->

कृषि संचालक (विस्तार व प्रशिक्षण)  दिलीप झेंडे यांनी 12 ऑगस्ट रोजी येरंडा भेट

कृषि संचालक (विस्तार व प्रशिक्षण) दिलीप झेंडे यांनी 12 ऑगस्ट रोजी येरंडा भेट

 


साप्ताहिक सागर आदित्य 

कृषी संचालक झेंडे यांची येरंडा येथे भेट 

शेत बांधावरील प्रयोगशाळेची पाहणी

वाशिम  कृषि संचालक (विस्तार व प्रशिक्षण)  दिलीप झेंडे यांनी 12 ऑगस्ट रोजी येरंडा भेट देऊन राज्य पुरस्कृत गळीत धान्य उत्पादकता वाढ व मूल्य साखळी योजनेअंतर्गत सोयाबीन प्रात्यक्षिक प्लॉटची आणि शेत बांधावरील प्रयोगशाळेची भेट देऊन पाहणी केली.

             प्रयोगशाळेत तयार करण्यात आलेल्या निविष्ठाचा वापर करून खर्चात बचत करावी तसेच उत्पादकता वाढीबरोबरच प्रक्रिया उद्योगातही उतरावे याबाबत उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.यावेळी त्यांच्यासोबत अमरावती विभागीय कृषी सहसंचालक किसन मुळे,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आरिफ शहा यांची प्रमुख उपस्थिती होती.

            झेंडे यांच्या येरंडा येथील भेटी दरम्यान कृषी विभागाचे अधिकारी व कर्मचारी तसेच जय किसान शेतकरी गटाचे अध्यक्ष दीपक घुगे,विजय घुगे,मनोहर सांगळे, सतीश कुरकुटे,वाशिम फार्म लॅबचे विठ्ठल ईडोळे,आकाश बोडके,जगन बोरकर गोविंद देशमुख,गजानन बाजड,बंडू  बोरकर,गजानन झाटे,बाबूलाल महाले,सरपंच सुरेशराव घुगे,नवनाथ घुगे,रमेश घुगे,शिवाजीराव घुगे,राजेश सांगळे,शिवाजी सांगळे, डॉ.वाघ व महादेव घुगे उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन कृषी सहायक मगर यांनी केले व आभार  पागनीस यांनी मानले.

Related Posts

0 Response to "कृषि संचालक (विस्तार व प्रशिक्षण) दिलीप झेंडे यांनी 12 ऑगस्ट रोजी येरंडा भेट "

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article