-->

इ. 9 वी व इ. 11 वी नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा  31 ऑक्टोबर ऑनलाईन अर्जाची मुदत

इ. 9 वी व इ. 11 वी नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा 31 ऑक्टोबर ऑनलाईन अर्जाची मुदत

 


साप्ताहिक सागर आदित्य 

इ. 9 वी व इ. 11 वी नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा

31 ऑक्टोबर ऑनलाईन अर्जाची मुदत


       वाशिम,  :  केन्द्रीय माध्यमिक शिक्षण बोर्ड, दिल्लीच्या वतीने घेण्यात येणारी जवाहर नवोदय विद्यालय निवड चाचणी परीक्षा इयत्ता 9 वी व इयत्ता 11 वी सन 2024 - 25 चे प्रवेश अर्ज ऑनलाईन पध्दतीने भरण्यास सुरुवात झाली आहे. जे विद्यार्थी जिल्हयातील रहिवासी आहेत आणि मान्यता प्राप्त सरकारी, निमसरकारी अथवा खाजगी शाळेत शैक्षणिक वर्ष 2023-24 च्या इयत्ता 8 वी व इयत्ता 10 वीत शिक्षण घेत असलेले विद्यार्थी या प्रवेश परिक्षेकरीता अर्ज करु शकतात. इच्छुक विद्यार्थ्यांचा जन्म 1 मे 2009 ते 31 जुलै 2011 दरम्यान झाला असावा. ते विद्यार्थी इयत्ता 9 वीच्या परीक्षेकरीता अर्ज करण्यास पात्र आहेत. ज्या विद्यार्थ्याचा जन्म दिनांक 1 जुन 2007 ते 31 जुलै 2009 दरम्यान झाला आहे. असे विद्यार्थी इयत्ता 11 वीच्या प्रवेश परीक्षेकरीता अर्ज करण्यास पात्र आहेत. अधिक माहितीसाठी तसेच परिक्षेचे स्वरुप व इतर विस्तृत माहिती नवोदय विद्यालय समितीच्या www.navodaya.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. ऑनलाईन अर्ज दिलेल्या संकेतस्थळावरुन विनामुल्य भरण्यास सुरु झाली आहे. ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम तारीख 31 ऑक्टोबर 2023 आहे. इयत्ता 9 वी व इयत्ता 11 वीची निवड चाचणी परिक्षा 10 फेब्रुवारी 2024 ला घेण्यात येणार असल्याचे जवाहर नवोदय विद्यालयाचे प्राचार्य एस.डी. खरात यांनी कळविले आहे.



0 Response to "इ. 9 वी व इ. 11 वी नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा 31 ऑक्टोबर ऑनलाईन अर्जाची मुदत"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article