वंचित बहुजन आघाडीची यशस्वीरीत्या सभा पार
साप्ताहिक सागर आदित्य/
वंचित बहुजन आघाडीची यशस्वीरीत्या सभा पार
रिसोड - वंचित बहुजन आघाडी रिसोड शहर व तालुका कमिटी यांच्या वतीने वाशिम जिल्हयातील नवयुक्त पदाधिकारी व पश्चिम विदर्भ अध्यक्ष पदी सिद्धार्थ देवळे यांची नियुक्ती झाल्याबद्दल सत्कार समारंभ आयोजीत केला होता. कार्यक्रमास डॉ. गजानन हूले जिल्हाध्यक्ष, सोबाजी इंगळे जिल्हामहासचिव, किरणताई गिरे महीला राज्यकारणी सदस्य, अकिलंभाई शहर तालुका अध्यक्ष , रविंद्र मोरे पाटील कार्यक्रम अध्यक्ष , सौ शेवाळे ताई महिला अध्यक्ष यांची मार्गदर्शनपर भाषणे झाली. वंचित बहुजन आघाडीच्या खऱ्या कार्यकत्यांवर भविष्यात केव्हाही अन्याय होणार नाही याची ग्वाही डॉ. सिद्धार्थ देवळे यांनी आपल्या भाषणामध्ये दिली कार्यक्रमास वंचित बहुजन आघाडीचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते . तसेच बौध महासभेचे व सम्यक विद्यार्थी आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रदिनभाऊ खंडारे अकील भाई , उत्तमराव झगडे , माधव जाधव , जहुर खान व सर्वच रिसोड शहर तालूका पदाधिकारी यांनी प्रयत्न केले.
0 Response to "वंचित बहुजन आघाडीची यशस्वीरीत्या सभा पार"
Post a Comment