कारंजेकरांची साक्षात सरस्वती लतादीदींना " न भुतो न भविष्यती " अशाप्रकारची मौन श्रद्धांजली !
साप्ताहिक सागर आदित्य/
कारंजेकरांची साक्षात सरस्वती लतादीदींना " न भुतो न भविष्यती " अशाप्रकारची मौन श्रद्धांजली !
कारंजा : लतादिदींच्या दुःखद निधनाने शोकाकुल झालेल्या कारंजेकरांनी एकत्र येत, कोरोना नियमावलीचे पालन करीत, कारंजा येथील शासकिय उपविभागीय अधिकारी, कार्यकारी दंडाधिकारी तथा तहसीलदार धिरज मांजरे, शहर पोलिस स्टेशनचे ठानेदार आधारसिंगजी सोनोने, नायब तहसिलदार विनोद हरणे, माजी नगराध्यक्ष अरविंद लाठीया, तसेच सर्वच राष्ट्रीय पक्षाच्या नेतेमंडळीच्या उपस्थितीत कारंजेकर संगीतप्रेमी लोककलावंत तथा कलारसिकांनी लतादीदींच्या मौन श्रध्दांजली कार्यक्रमात आपला सहभाग नोंदवला होता . यावेळी सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते दिदींच्या प्रतिमेला आणि आझाद हिंद व्यायाम शाळेच्या परिसरातील, नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्याचे पूजन करून अभिवादन करून दोन मिनिटे सामुहिक मौन्य श्रद्धांजली अर्पण करण्यात आली . तसेच त्यानंतर प्रत्येकांनी पुष्प अर्पण करीत लतादिदींना अश्रूपूर्ण श्रध्दांजली समर्पित केली . याबाबत सविस्तर वृत्त असे की, लोककलावंत तथा पत्रकार संजय कडोळे यांच्या कल्पनेतून एकत्र येत संगीतसूर्य केशवराव भोसले सांस्कृतिक परिषद, द्वारकामाई संगीत मैफिल, ईरो फिल्म अॅन्ड म्युझिक तथा विदर्भ लोककलावंत संघटना कारंजा, अ भा नाट्य परिषद कारंजा यांनी एकत्र येत, आझाद हिंद व्यायाम शाळेच्या सहकार्याने सामुहिक मौन श्रद्धांजलीचे आयोजन केले होते . सदर्हु कार्यक्रमाला उपविभागीय कार्यालय, तहसिल कार्यालय, कारंजा नगर परिषदेचे सहकार्य लाभले . शिवाय सर्व राजकिय पक्षाच्या नेतेमंडळीनी पक्षपात न करता हजेरी लावली . यावेळी माजी समाज कल्याण सभापती जयकिसन राठोड, माजी नगराध्यक्षा उर्मिलाताई इंगोले, भाजपा शहराध्यक्ष ललित चांडक, पवनसेठ रॉय, कश्यप सेठ,शिवसेना शहर प्रमुख - गणेशराव बाबरे, सेवादल काँग्रेसचे एड संदेश जिंतुरकर, राजीक शेख, माजी नगरसेवक नितीन गढवाले, शंभूराजे जिचकार, सलिम तेली,महाराष्ट्र शासन पुरस्कारार्थी रामबकस डेंडूळे, प्रकाश गवळीकर, शिवमंगल राऊत, प्रदिप वानखडे, पायल तिवारी, शारदाताई बांडे, अर्चना कदम, प्राजक्ता माहितकर, सानिका देशपांडे, पिंकी ताई शुक्ला, निताताई पापळकर, सौ सुधाताई चवरे, सौ . जोहरापूरकर,माजी मुख्याध्यापिका सौ चंदा माने, नाट्य अभिनेत्री अर्चना तोमर, छायाताई शामसुंदर, आशाताई कव्हळकर,वंदना खंडारे, प्रणिता दसरे, कु . मयुरी गुप्ता, उषा नाईक,किशोर धाकतोड, शशी वेरुळकर, रंजीत रोतळे, माजी सैनिक गायकवाड, पत्रकार दिलीप रोकडे, एकनाथ पवार, समिर देशपांडे, अमोल अघम, कालूभाई तवंगर, मोहम्मद मुन्नि वाले हाफिजखान,तसेच कार्यक्रमाचे संयोजक कुंदन शामसुंदर, श्याम वानखडे, नंदकिशोर कव्हळकर, पांडूरंग माने, मोहित जोहरापूरकर, देविदास नांदेकर, विजय राठोड, डॉ ज्ञानेश्वर गरड, श्रीकांत भाके,मुरलिधर ताथोड, रजनिश फुकटे रविन्द्र नंदाने, ज्ञानेश्वर खंडारे, राहुल सावंत,हिमंत मोहकर, सुनिल डाखोरे, उमेश अनासाने, विजय खंडार इत्यांदींची उपस्थिती होती . कार्यक्रमाचे संचालन संजय कडोळे यांनी केले .यावेळी पोलीस प्रशासनाने सुद्धा मानवंदना दिली .
0 Response to "कारंजेकरांची साक्षात सरस्वती लतादीदींना " न भुतो न भविष्यती " अशाप्रकारची मौन श्रद्धांजली !"
Post a Comment