
शिष्यवृत्ती परीक्षेत भारत प्राथमिक शाळेचे सुयश
साप्ताहिक सागर आदित्य
शिष्यवृत्ती परीक्षेत भारत प्राथमिक शाळेचे सुयश
रिसोड : उज्वल यशाची परंपरा कायम राखीत भारत प्राथमिक शाळेतील विद्यार्थिनींनी शिष्यवृत्ती परीक्षेत ह्याही वर्षी घवघवित यश संपादन केले आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे द्वारा घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये भारत प्राथमिक शाळेतील तीन विद्यार्थिनींनी गुणवत्ता यादीत येऊन हे सुयश प्राप्त केले. शहरी सर्वसाधारण प्रवर्गाच्या जिल्हास्तरीय गुणवत्ता यादीत आर्या विशालआप्पा गांजरे हिने 71.8% गुणांसह 18वे, हर्षदा अनिल बशिरे, 71.1 % गुणांसह 22 वे, तर नियती शंकर काळबांडे हिने 63% गुणांसह 60 वे स्थान प्राप्त केले आहे. सदर गुणवंत विद्यार्थिनींचा शाळेच्या अध्यक्षा जयश्रीताई देशमुख यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. विद्यार्थिनींनी आपल्या यशाचे श्रेय मुख्याध्यापिका किरणताई दुबे, मार्गदर्शक शिक्षक व आपल्या आई वडिलांना दिले आहे.
0 Response to "शिष्यवृत्ती परीक्षेत भारत प्राथमिक शाळेचे सुयश"
Post a Comment