स्व. भागूबाई कुंडलिक मुखमाले यांचे मरणोत्तर नेत्रदान
साप्ताहिक सागर आदित्य
स्व. भागूबाई कुंडलिक मुखमाले यांचे मरणोत्तर नेत्रदान
मैजे चिवरा ता. मालेगांव जि. वाशिम येथील डॉ. किशोर मुखमाले यांची आजी स्व. भागूबाई कुंडलिक मुखमाले यांच्या वयाच्या ८४ व्या वर्षी दिनांक २१/११/२०२४ रोजी सकाळी १०:३० वाजता निधन झाले. त्यांच्या मागे बराच मोठा आप्त परिवार आहे तसेच संपुर्ण मुखमाले कुंटुबातील आधारस्तंभ तथा सर्वाना सोबत घेऊन चालणाऱ्या तसेच समाजकार्याची आवड असलेल्या स्व. भागूबाई कुंडलिक मुखमाले यांचे निधन झाल्याने संपुर्ण मुखमाले कुटुंबावर दुःखाचा डोंगर उभा असताना मुखमाले कुंटुबीयांनी एवढया दुखामध्येही मुत्यनंतर नेत्रदान करुन दोन अंधाच्या जीवनात प्रकाश निर्माण करण्यासाठी नेत्रदान करण्याची इच्छा जिल्हा रुग्णालयाचे अति. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अविनाश पूरी याच्यांकडे व्यक्त केली त्यानूसार जिल्हा सामान्य रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल कावरखे, नेत्र शल्यचिकित्सक, डॉ. आशिष बेदरकर, यांच्या मार्गदर्शनाखाली नेत्र चिकित्सा अधिकारी ज्ञानेश्वर पोटफोडे व नेत्रदान समुपदेशक रमेश ठाकरे यांनी स्व. भागूबाई कुंडलिक मुखमाले यांची नेत्र बुबुळे काढली व नेत्र बुबुळे त्याच दिवशी वैद्यकिय महाविद्यालय, अकोला येथे पाठविण्यात आली. तरी सदरील नेत्रदान करण्याकरीता मुखमाले कुंटुबाचे सहकार्य लाभले.
तरी सर्व समाजातील गणमान्य व्यक्तींनी या नेत्रदान चळवळीत सक्रीय सहभाग घेवुन नेत्रदान चळवळ ही लोक चळवळ व्हावी. मृत्यूनंतर जवळच्या व्यक्तीचे त्वरीत नेत्रदान घडवून आणावे व नेत्रदाना नंतरच मृतावर अंतिम संस्कार करावे असे अवाहन अंधत्व नियंत्रण कार्यक्रमाचे कार्यकारी समितीचे अध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे व जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. अनिल कावरखे यांनी केले असून मुखमाले कुटुंबाचे आभार मानले आहेत.
नेत्रदानासाठी संपर्क 99 22 51 99 48 जिल्हा रुग्णालय वाशिम
0 Response to "स्व. भागूबाई कुंडलिक मुखमाले यांचे मरणोत्तर नेत्रदान"
Post a Comment