-->

यंत्रणेची झाली पूर्ण तयारी'  'मतदार राजा' आता तुझी जबाबदारी'         जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस

यंत्रणेची झाली पूर्ण तयारी' 'मतदार राजा' आता तुझी जबाबदारी' जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस

 


साप्ताहिक सागर आदित्य 

'यंत्रणेची झाली पूर्ण तयारी'

'मतदार राजा' आता तुझी जबाबदारी'

       जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस


१० लाख ९ हजार १०७ मतदार बजाविणार हक्क

दिव्यांग मतदारांसाठी विशेष सुविधा

८८ मतदान केंद्रांचे सजावटीकरण

६ हजार ३१० कर्मचाऱ्यांची नियुक्ती

२ हजार ४२६ पोलिस अधिकारी व कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात

वाशिम, : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी २० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदान होणार असून यासाठी जिल्हा निवडणूक यंत्रणा सज्ज झाली असल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी बुवनेश्वरी एस यांनी सांगितले. 


जिल्ह्यात ५ लाख २१ हजार ८५८ पुरुष, ४ लाख ८७ हजार २३० महिला व १९ तृतीयपंथी असे एकूण १० लाख ९ हजार १०७  मतदार आहेत. यामध्ये ९ हजार ४३० दिव्यांग मतदारांचा समावेश आहे. जिल्ह्यातील १ हजार १०० मतदान केंद्रांवर बुधवारी मतदान प्रक्रिया होणार आहे. महिलांकडून संनियंत्रण करणारी आणि व्यवस्थापनावर भर देणारी प्रत्येक विधानसभा मतदारसंघात एक या प्रमाणे जिल्ह्यात  ३ ‘सखी मतदार केंद्रे’ , युवा मतदान केंद्र ३ तसेच ३ दिव्यांग मतदान केंद्र स्थापन केली जाणार आहेत. मतदानादिवशी जिल्ह्यातील ५५२ मतदान केंद्रांवरील मतदान प्रक्रियेचे 'वेब कास्टिंग' होणार आहे. या मतदान केंद्रांवर ‘सीसीटीव्ही’द्वारे निवडणूक यंत्रणेची थेट नजर राहणार आहे, असे जिल्हाधिकारी श्रीमती बुवनेश्वरी यांनी सांगितले.


*मतदारांसाठी सुविधा*

मतदान केंद्रांवर पिण्याचे पाणी, विद्युत पुरवठा, ब्रेल भाषेतील मतपत्रिका, शौचालय, स्वयंसेवक आदी किमान सुविधा पुरविण्यात येणार आहेत. सर्व मतदान केंद्रांवर दिव्यांग तसेच वयोवृद्ध मतदारांकरिता व्हीलचेअर व रॅम्पची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच दिव्यांग बांधवांसाठी मोफत वाहतूक व्यवस्था, मदतीसाठी स्वयंसेवक नियुक्त केले जाणार आहेत. लहान मुलांसह मतदानास येणाऱ्या महिला मतदारांच्या मुलांकरिता मतदान केंद्रांवर पाळणाघराची व्यवस्था करण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीसाठी १ हजार ३१९ बॅलेट युनिट आणि कंट्रोल युनिट तर १ हजार ४२९ व्हीव्हीपॅट (व्होटर व्हेरिफायबल पेपर ऑडिट्रेल) यंत्रे पुरवण्यात आली आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी सुमारे ६ हजार ३१० कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच २ हजार ४२६ पोलिस अधिकारी व कर्मचारी मतदान बंदोबस्तात समाविष्ट आहेत.


निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी व शांततेत, निर्भयपणे व पारदर्शीपणे निवडणुका पार पाडण्यासाठी पोलीस दल सज्ज आहे. कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने जिल्ह्यातील सर्व ११०० मतदान केंद्रांवर फौजदारी दंड प्रक्रिया संहिता प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. ५ व्यक्तींपेक्षा जास्त व्यक्तींना एकाच ठिकाणी जमाव करण्यास प्रतिबंध करण्यात आल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.


*मतदान केंद्राची माहिती अशी मिळवा*


मतदारांना एका क्लिकवर मतदान केंद्र व मतदार यादीतील त्यांची माहिती मिळविण्याची सुविधा भारत निवडणूक आयोगाच्या https://electoralsearch.in  या संकेतस्थळावर व voter turnout वर उपलब्ध करून देण्यात आली आहे. यावर स्वतःची संपूर्ण माहिती नमूद केल्यास माहितीचा शोध घेता येतो. माहिती भरताना नाव, वडील/पतीचे नाव, वय अथवा जन्मतारीख, लिंग, राज्य, जिल्हा, विधानसभा मतदारसंघ या बाबींचा समावेश करावा. मतदार ओळख क्रमांक व राज्याचे नाव टाकल्यानंतर मतदारांची माहिती मिळविण्याची दुसरी सुविधाही या संकेतस्थळावर आहे. तसेच मतदारांच्या मदतीसाठी ‘व्होटर हेल्पलाईन-१९५०’ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून मतदारांना माहिती मिळवता येईल. मतदारांसाठी निवडणूक आयोगाने ‘व्होटर हेल्पलाईन ॲप’ ही सुरु केले आहे.


*१२२ लालपरी सज्ज*

वाशिम विधानसभा मतदारसंघात ४३ , रिसोड ३८, कारंजा ४१ अश्या प्रकारे एकुण १२२ बसेसची मतदारसंघनिहाय व्यवस्था करण्यात आली आहे.


*मतदानासाठी आवश्यक ओळखपत्र*

मतदानासाठी मतदार यादीत नाव असणे आवश्यक आहे. भारत निवडणूक आयोगाचे मतदान ओळखपत्र नसेल अशावेळी पासपोर्ट (पारपत्र), वाहन चालक परवाना, छायाचित्र असलेले कर्मचारी ओळखपत्र (राज्य/केंद्र शासन, सार्वजनिक उपक्रम, सार्वजनिक मर्यादित कंपन्यांचे ओळखपत्र), छायाचित्र असलेले बँकांचे/टपाल कार्यालयाचे पासबूक, पॅनकार्ड, राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (नॅशनल पॉप्युलेशन रजिस्ट्रेशन) अंतर्गत महसूल निर्मिती निर्देशांक (रेव्हेन्यू जनरेशन इंडेक्स) द्वारे दिलेले स्मार्टकार्ड, मनरेगा जॉबकार्ड, कामगार मंत्रालयाने दिलेले आरोग्य विमा स्मार्टकार्ड, छायाचित्र असलेले निवृत्तीवेतन दस्तावेज, खासदार/आमदार/विधानपरिषद सदस्य यांना दिलेले ओळखपत्र अथवा आधारकार्ड यापैकी एक ओळखपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहे.


*पोस्टल बॅलेट व गृह मतदान*

निवडणूक कर्तव्यावर असणाऱ्या ५ हजार ७८२ अधिकारी व कर्मचाऱ्यांचनी पोस्टल बॅलेटव्दारे मतदान केले.१ हजार ३८९ ज्येष्ठ नागरिकांचे गृहमतदान पार पडले.


प्रत्येकाने मतदानाचा हक्क बजावावा : जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस


मतदार जागृतीसाठी जिल्ह्यात ‘स्वीप’ अंतर्गत विविध उपक्रम राबविण्यात आले. या सर्व उपक्रमांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.दि.२० नोव्हेंबर रोजी जिल्ह्यातील प्रत्येक मतदाराने आपला मतदानाचा हक्क बजवावा, विशेषतः महिला व दिव्यांग मतदारांनी अवश्य मतदान करावे. दिव्यांग मतदारांसाठी मतदान केंद्रांवर विविध सुविधा, आवश्यकतेनुसार मोफत वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. जिल्ह्यात १८ नोव्हेंबरपर्यंत ९ लाख ३५ हजार मतदारांपर्यंत वोटर स्लिपचे वितरण करण्यात आले आहे. प्रत्येक दिव्यांग मतदार बांधवांनी मतदान करावे. लोकशाहीमध्ये प्रत्येक मत महत्वाचे आहे, त्यामुळे प्रत्येकाने आपला मतदानाचा अधिकार बजावून लोकशाही बळकट करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी बुवनेश्वरी एस यांनी केले.

0 Response to "यंत्रणेची झाली पूर्ण तयारी' 'मतदार राजा' आता तुझी जबाबदारी' जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article