मतदानासाठी मतदान साहित्य घेऊन पथके रवाना निवडणूक निरिक्षकांनी केली मतदान साहित्य वितरण कार्याची पाहणी
साप्ताहिक सागर आदित्य
मतदानासाठी मतदान साहित्य घेऊन पथके रवाना
निवडणूक निरिक्षकांनी केली मतदान साहित्य वितरण कार्याची पाहणी
वाशिम, विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी बुधवार, दि. २० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदान होणार आहे. मतदानाची प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. मतदानासाठी जिल्हयातील वाशिम, रिसोड, कारंजा या विधानसभा मतदारसंघांतील मतदान केंद्रांवर मतदानाचे साहित्य सोबत घेऊन अतिशय उत्साहाच्या वातावरणात कर्मचारी आज रवाना झाले. आज दि.१९ नोव्हेंबर रोजी निवडणूक निरीक्षक अनिलकुमार झा यांनी
वाशिम येथील कोरोनेशन हॉल, क्रीडा संकुलाच्या बाजूला ठेवण्यात आलेले मतदान साहित्य वितरणाची व व्यवस्थेची पाहणी केली. मतदान केंद्रांवर साहित्य घेऊन जाण्यासाठी सकाळीच कर्मचारी आले होते. या ठिकाणाहून ईव्हीएम मशीन व मतदान साहित्य, साधनसामग्रींचे निवडणूक विभागाकडून संबंधित पोलींग पार्टींना वितरण करण्यात आले.यावेळी निवडणूक निरीक्षक अनिलकुमार झा यांच्यासमवेत जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी बुवनेश्वरी एस, वाशिम निवडणूक निर्णय अधिकारी राजेंद्र जाधव, मंगरूळपीर सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी शीतल बंडगर, वाशिम सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार निलेश पळसकर आदी यावेळी उपस्थित होते. उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांत उत्साह दिसून आला.
0 Response to "मतदानासाठी मतदान साहित्य घेऊन पथके रवाना निवडणूक निरिक्षकांनी केली मतदान साहित्य वितरण कार्याची पाहणी"
Post a Comment