वाशिमची निधी शर्मा सीए परिक्षा उत्तीर्ण स्वकर्तृत्वातुन एसटी कर्मचार्याच्या मुलीचे शिक्षण क्षेत्रात यश
साप्ताहिक सागर आदित्य/
वाशिमची निधी शर्मा सीए परिक्षा उत्तीर्ण
स्वकर्तृत्वातुन एसटी कर्मचार्याच्या मुलीचे शिक्षण क्षेत्रात यश
वाशिम - येथील एसटी महामंडळात वाहक म्हणून कार्यरत व शुक्रवारपेठेतील रहिवासी संजय रामदयाल शर्मा यांची मुलगी कु. निधी (वय २५) हिने चार्टर्ड अकाऊंटंट (सीए) ही अत्यंत कठीण परिक्षा उत्तीर्ण करुन घवघवीत यश मिळविले आहे. पुणे येथे शिक्षण पुर्ण करुन या परिक्षेत निधी ही २०७ गुणांनी उत्तीर्ण झाली आहे. अत्यंत साधारण परिस्थितीत निधीने शिक्षण क्षेत्रात अपार परिश्रम घेवून हे यश पादाक्रांत केले आहे. निधीचा भाऊ निलेश हा ही एमबीए झाला असून हैद्राबाद येथे नोकरी करीत आहे. निधीने १० वी पर्यतचे शिक्षण वाशिमच्या शांतीनिकेतन शाळेत घेतले असून त्यानंतर अकोला येथील आर.एल.टी महाविद्यालयात १२ वी पर्यत शिक्षण पुर्ण केले आहे. तीला दहावीमध्ये ९२ टक्के तर १२ वी मध्ये ९४ टक्के गुण मिळाले होते. आपल्या दोन्ही मुलांनी शिकुन खुप मोठे व्हावे असे स्वप्न पाहत वडील संजय शर्मा यांनी साधारण परिस्थितीत ओढाताण करुन मुलांचे शिक्षण सुरु ठेवले होते. तर निलेश व निधी ही दोन्ही मुले हुशार असल्यामुळे शिक्षण क्षेत्रात त्यांनी यश मिळवून आईवडीलांचे स्वप्न पुर्ण केले आहे. निधीला मिळालेल्या यशाबद्दल तिच्यावर विविध स्तरातुन कौतुकाचा वर्षाव होत आहे.
केले.
0 Response to "वाशिमची निधी शर्मा सीए परिक्षा उत्तीर्ण स्वकर्तृत्वातुन एसटी कर्मचार्याच्या मुलीचे शिक्षण क्षेत्रात यश"
Post a Comment