
वाकद येथे फातिमा शेख यांची जयंती साजरी रिसोड तालुक्यातील वाकद येथे उपेक्षित सत्यशोधक फातिमा शेख यांची जयंती दिनांक 9 जानेवारी रोजी साजरी
साप्ताहिक सागर आदित्य
वाकद येथे फातिमा शेख यांची जयंती साजरी रिसोड तालुक्यातील वाकद येथे उपेक्षित सत्यशोधक फातिमा शेख यांची जयंती दिनांक 9 जानेवारी रोजी साजरी करण्यात आली सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी रावसाहेब देशमुख मा.जि.प.सदस्य हे होते तर प्रमुख उपस्थितीमध्ये शेख रऊफ शेख अन्वर ग्रामपंचायत सदस्य शेख मुनाफ , वैभव देशमुख, गजानन ताटर, अमोल खनपटे,नशीर शाह सै.असलम ,रफीक कुरैशी, शेख आवेश आदींची उपस्थिती होती याप्रसंगी अध्यक्षस्थानी बोलताना रावसाहेब देशमुख म्हणाले की फातिमा शेख यांनी सावित्रीबाई फुले यांच्यासोबत अनेक दलित तसेच मुस्लिम महिलांना व मुलांना शिक्षण देण्याचे महत्त्वाचे कार्य केले फातिमा शेख या सावित्रीबाई फुले यांच्या सोबत असल्यामुळे त्या दोघींच्या अतिशय घनिष्ठ संबंध होते दोघीही समविचारांच्या असल्यामुळे त्यांनी अनेकांना शिक्षणाची ओढ लावून दिली या दोघींनी महिलांसाठी सर्वप्रथम शाळा सुरू केली कार्यक्रम चे सुत्रसंचालन मुनसीफ खाॅ.पठान तर आभार प्रदर्शन शेख शाहरुख यांनी केले.
0 Response to "वाकद येथे फातिमा शेख यांची जयंती साजरी रिसोड तालुक्यातील वाकद येथे उपेक्षित सत्यशोधक फातिमा शेख यांची जयंती दिनांक 9 जानेवारी रोजी साजरी"
Post a Comment