
एकलव्य मॉडेल रेसिडेन्सियल स्कूल 10 जानेवारीपर्यंत प्रवेश अर्ज आमंत्रित
साप्ताहिक सागर आदित्य
एकलव्य मॉडेल रेसिडेन्सियल स्कूल
10 जानेवारीपर्यंत प्रवेश अर्ज आमंत्रित
वाशिम, : इंग्रजी माध्यमाच्या एकलव्य रेसिडेन्सियल पब्लीक सकुलमध्ये प्रवेशासाठी 26 फेब्रुवारी 2023 रोजी आयोजित परीक्षेकरीता प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, अकोला यांच्या कार्यक्षेत्रातील अकोला, बुलडाणा व वाशिम जिल्हयातील सर्व शासकीय व अनुदानित आश्रम शाळा, जिल्हा परिषद व नगरपालिकेच्या प्राथमिक व माध्यमिक शाळा तसेच सर्व शासनमान्य अनुदानित प्राथमिक व माध्यमिक शाळेतील सन 2022-23 या शैक्षणिक वर्षात इ. 5 वी, 6 वी, 7 वी व 8 वी मध्ये शिक्षण घेत असलेल्या अनुसूचित जमातीचे विद्यार्थी या स्पर्धा परीक्षेसाठी पात्र राहतील.
वरील सर्व शाळेतील मुख्याध्यापकांनी या प्रवेश परीक्षेचे आवेदन पात्र विद्यार्थ्यांकडून भरुन घेऊन प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, अकोला यांच्याकडे सादर करावे. विहीत नमुन्यातील अर्ज संबंधित शासकीय अनुदानित आश्रम शाळेतील मुख्याध्यापक किंवा प्रकल्प कार्यालय, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, अकोला यांच्याकडे विनामुल्य उपलब्ध आहेत. हे अर्ज 10 जानेवारी 2023 पर्यंत प्रकल्प कार्यालयाकडे मुख्याध्यापक यांच्यामार्फत सादर करावे.
आवेदन पत्रासोबत सक्षम अधिकाऱ्यांनी दिलेल्या वार्षिक उत्पन्नाचा तसेच पालकांचा/विद्यार्थ्यांचा जातीचा दाखला आवेदन पत्रासोबत जोडण्यात यावा. प्रवेश अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत 10 जानेवारी 2023 आहे. परीक्षेचे ठिकाण व वेळ पुढीलप्रमाणे आहे. 26 फेब्रुवारी 2023 रोजी इयत्ता 6 वी करीता सकाळी 11 ते दुपारी 1 वाजेपर्यंत व इयत्ता 7 वी ते 9 वी करीता सकाळी 11 ते दुपारी 2 वाजेपर्यंत राहणार असल्याचे अकोला एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी राजेंद्रकुमार हिवाळे यांनी कळविले आहे.
0 Response to "एकलव्य मॉडेल रेसिडेन्सियल स्कूल 10 जानेवारीपर्यंत प्रवेश अर्ज आमंत्रित"
Post a Comment