-->

पिंपळा येथे ग्रा.पं.सरपंच, उपसरपंच व सदस्यांचा पदग्रहण समारंभ संपन्न

पिंपळा येथे ग्रा.पं.सरपंच, उपसरपंच व सदस्यांचा पदग्रहण समारंभ संपन्न

 


 

साप्ताहिक सागर आदित्य 

पिंपळा येथे ग्रा.पं.सरपंच, उपसरपंच व सदस्यांचा पदग्रहण समारंभ संपन्न

    मालेगाव तालुक्यातील पिंपळा येथील नवनिर्वाचित ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांचा पदग्रहण समारंभ दि.०३ जानेवारी २०२३ रोजी ग्रामपंचायत कार्यालयात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. 

      सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजीमहाराज, विश्वरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर,क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, तसेच क्रांतिकारक वीर बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे हारार्पण करून पुजन करण्यात आले. 

   मागील महिन्यात झालेल्या ग्रामपंचायत निवडणूकीमध्ये पिंपळा ग्रामस्थांनी ज्या  सरपंच व सदस्यांना निवडून दिले. त्यामध्ये सरपंच म्हणून सौ.राधा संतोष ढंगारे ,उपसरपंच म्हणून सौ.रंजना अशोक राऊत व ग्रामपंचायत सदस्य म्हणून सौ.ललिता मधुकर पाखरे, सौ.भागूबाई रामकिसन धोंगडे, सौ.गायत्री संतोष गुडदे, शरद जनार्धन गुडदे, वसुदेव विठ्ठल लोखंडे ज्ञानेश्वर सदाशिव गावंडे  या सर्वांना पिंपळा गावचे ग्रामसचिव अजित बुरे  यांच्या हस्ते पदग्रहण तथा  शपथविधी देण्यात आला. 

      पदग्रहण समारंभ पार पडल्यानंतर सरपंच, उपसरपंच व सदस्य यांनी गावकऱ्यांनी दिलेल्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही.तसेच गावाच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असे उपस्थितांना सांगितले.

    कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तलाठी  सुर्वे  तसेच आभारप्रदर्शन ग्रामसचिव अजित बुरे  यांनी केले. कार्यक्रमाला ग्रामपंचायत संगणक परिचालक समाधान धोंगडे, कर्मचारी  वसुदेव पाखरे  तथा गावातील नागरिक बहूसंख्येने उपस्थित होते

Related Posts

0 Response to "पिंपळा येथे ग्रा.पं.सरपंच, उपसरपंच व सदस्यांचा पदग्रहण समारंभ संपन्न"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article