निशुल्क शिबीर
साप्ताहिक सागर आदित्य/
संजीवनी हॉस्पिटल अँड ॲडव्हान्स पाइल्स केअर सेंटर, वाशिम व गजानन हॉस्पिटल, अनसिंग यांच्या संयुक्त विद्यमाने अनसिंग येथील डॉ. संदीप बाजड यांच्या गजानन हॉस्पिटल येथे दिनांक २७ मार्च २०२२ रोजी सकाळी ११ ते ४ या वेळात निशुल्क मूळव्याध, भगंदर ,फिशर, गाठीचे आजार यावर निदान व लेझर द्वारे उपचार शिबिर आयोजित केले आहे या शिबिरामध्ये डॉ. जागृती आंबेकर ( M.S.) व डॉ. सागर आंबेकर ( M.D .)रुग्णांची तपासणी करणार आहे. शिबिरातील ज्या रुग्णांना शस्त्रक्रियेची आवश्यकता आहे त्यांना योग्य ती तारीख देऊन अल्प दरात शस्त्रक्रिया करून देण्यात येईल शिबिरात नाव नोंदणी करता डी.एस. देशमुख ९७६७५६८९५७ यांच्याशी संपर्क करावा. हे शिबिर डॉ. संदीप बाजड यांचे गजानन हॉस्पिटल, वाशिम अर्बन बँके मागे ,मेन रोड अनसिंग येथे आयोजित केले आहे तरी जास्तीत जास्त रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा अशी विनंती आयोजकांनी केली आहे.
0 Response to " निशुल्क शिबीर"
Post a Comment