आज जागतिक क्षयरोग दिनानिमित्त जनजागृती कार्यक्रम
साप्ताहिक सागर आदित्य/
आज जागतिक क्षयरोग दिनानिमित्त जनजागृती कार्यक्रम
वाशिम - या वर्षीच्या क्षयरोग दिनाचे घोषवाक्य “टीबी संपविण्यासाठी गुंतवणुक करा व जीव वाचवा" हे असुन याच धर्तीवर क्षयरोग दिन साजरा करण्यात येणार आहे. जागतिक क्षयरोग दिनानिमित्ताने सर्व स्तरावर २१ दिवस "टीबी मुक्त भारत कॅम्पेन" ही मोहिम राबविली जाणार आहे.क्षयरोगाबाबत लक्षणे असल्यास सर्व शासकीय रुग्णालयासी संपर्क करावा तसेच टोल फ्री क्र. १८००११६६६६ या क्रमांकावर कॉल करुन अधिक माहीती मिळविता येईल.
जागतीक क्षयरोग दिनानिमित्त जनजागरण रैली ,"टीबी मुक्त भारत कॅम्पेन " मायकिंग व्दारे जनजागृतीचे आयोजन जिल्हा क्षयरोग कार्यालयाच्या वतीने जनजागृती रॅली , टीबी मुक्त भारत कॅम्पेन व मायकिंगव्दारे जनजागृतीचे आयोजन करण्यात आले आहे. क्षयरोगाला नियंत्रणात आणण्यासाठी सार्वजनिक आरोग्य यंत्रणेसोबतच जनतेचा सहभाग मिळणे आवश्यक आहे. त्यासाठी शासनाने लोकजागृती व्हावी म्हणुन राष्ट्रीय क्षयरोग दुरिकरण कार्यक्रम सुरु केला आहे. २४ मार्च रोजी जगभर जागतीक क्षयरोग दिन साजरा करण्यात येत आहे. याचे औचित्य साधुन क्षयरोग विषयाची माहिती जनतेला व्हावी यासाठी जिल्हा क्षयरोग कार्यालयाच्यावतीने २४ मार्च रोजी सकाळी ८ वाजता जनजागरण रॅली,टीबी मुक्त भारत कॅम्पेन व मायकिंग ब्दारे जनजागृतीचे आयोजन केले आहे. या जनजागृती रॅलीला जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.विजय काळबंडे,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कोरे हे हिरवी झेंडी दाखवून सुरुवात करतील.
“क्षयरोग नियंत्रण" कार्यक्रमाला सहकार्य करून एकजुटिने हातभार लावावा यामुळे टी.बी हारेल,देश जिंकेल" असे आवाहन जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस.,जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी वसुमना पंत यांनी केले आहे.
0 Response to "आज जागतिक क्षयरोग दिनानिमित्त जनजागृती कार्यक्रम"
Post a Comment