
सोनखास नगरीमध्ये प्रथमच एक दिवसीय श्री गजानन विजय ग्रंथ महापारायण सोहळा
साप्ताहिक सागर आदित्य/
सोनखास नगरीमध्ये प्रथमच एक दिवसीय श्री गजानन विजय ग्रंथ महापारायण सोहळा
वाशिम : येथून जवळच असलेल्या श्री गजानन महाराज संस्थान सोनखास येथे एक दिवसीय श्री गजानन विजय ग्रंथ महा परायण सोहळा दि. २० मार्च २०२२ रोजी मोठ्या भक्ती भावाने व उत्साहात पार पडला. यावेळी श्री गजानन भक्त मुखोद्त पारायण वाचक सौ. विद्याताई पडवळ (उनवणे) ठाणे (मुंबई) यांच्या वाणीतून महापरायण पार पडले.
इश म्हणजे कृपासिंधू समर्थ संत श्रेष्ठ श्री गजानन महाराज न मम म्हणजे माझे नाही तर हा महापारायण सोळहळा श्री राष्ट्राला समर्पीत. निरंतर सुखाच्या अपेक्षेने मानवी प्राणी अखंड धडपड करतो. या धडपडीत सर्वोच्च शक्ती, दैवशक्तींचा स्पर्श संत महात्मांद्वारे जनमानसांना होतो. सर्वांनी सर्वांमध्ये ईश्वर पहावा, असा मुलमंत्र गण गण गणात बोते सांगणारे विदर्भ संत श्री गजानन महाराज, सर्वांचे सौभाग्य आहे. सकल मानव जातीच्या आणि विशेषत: समस्त शेतकरी बंधुच्या कल्याणाकरीता यासाठी आपण सामुदायीकतेने सकारात्मक उर्जा सकल मानवी समाजात निर्माण व्हावी, म्हणून श्री गजानन महाराज यांच्या विजय ग्रंथाचे महापारायणचे आयोजन करुन विश्वशांती विश्वस्नेहाची आणि सर्वांचे कल्याण व्हावे या हेतुने महापरायण सोहळा आयोजित केला होता. या पारायणासाठी पंचक्रोशीत सर्व भक्तगण आले होते.
यावेळी महापारायण समाप्ती नंतर गावातील व परिसरातील हजारो भावीक भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. एकूणच या पारायणामुळे सोनखास- वाशिम व परिसरात भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आयोजकांनी अथक परिश्रम घेतले. सर्व कार्यक्रम खेळीमेळीच्या व उत्साहाच्या वातावरणात पार पडला. अशी माहिती सौ. स्वाती जगन्नाथ बोंडे यांनी दिली.
0 Response to "सोनखास नगरीमध्ये प्रथमच एक दिवसीय श्री गजानन विजय ग्रंथ महापारायण सोहळा"
Post a Comment