निशुल्क मुळव्याध - भगंदर तपासणी शिबीर
साप्ताहिक सागर आदित्य/
निशुल्क मुळव्याध - भगंदर तपासणी शिबीर
जगदंबा देवी संस्थान नागरतास येथे
दि. २६ मार्च २०२२ शनिवार होणार शिबीर
मालेगाव : माजी सभापती गजाननराव देवळे यांच्या वाढदिवसा निमित्त २६ मार्च रोजी नागरतास येथे मोफत भव्य मुळव्याध व भगंदर तपासणी शिबीराचे आयोजन सुश्रुत हॉस्पीटल मालेगांव च्या वतीने करण्यात आले आहे. या शिबीराचा लाभ गरजू रुग्णांनी घ्यावा असे आवाहन मुळव्याध तज्ञ डॉ. राजेश दळवे यांनी प्रसिध्दी पत्राद्वारे केले आहे.
२६ मार्च रोजी कृऊबास मालेगावचे माजी सभापती गजाननराव देवळे यांच्या वाढदिवस निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्या निमित्ताने मालेगांव येथील डॉ राजेश दळवे यांचे सुश्रुत हॉस्पीटल तसेच गजाननराव देवळे मित्रमंडळ आणी जनविकास आघाडी मालेगांव च्या संयुक्त विद्यमाने जगदंबा संस्थान नागरतास
येथे मोफत भव्य मुळव्याध व तपासणी भगंदर शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी ११ ते ३ वाजे पर्यंत हे शिबीर होणार असुन मुळव्याध व भगंदर तज्ञ डॉ राजेश दळवे रुग्णांची मोफत तपासणी करणार आहेत. या शिबीराचा लाभ गरजू रुग्णांनी घ्यावा असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे सध्या धावपळीचे युग आहे. वेळेवर जेवण न करणे, वेळेवर न झोपणे, नियमित व्यायाम न करणे, आहारात तिखट व मसाल्याचे प्रमाण जास्त असल्याने मुळव्याधीचा त्रास सुरू होतो. या व्याधीवर वेळेतच उपचार केल्यास ती पूर्णपणे बरी होऊ शकते. त्यासाठी वरील बाबी बाबत काळजी घेतल्यास ही बिमारी टाळताही येऊ शकते. असे यावेळी बोलतांना डॉ दळवे. यांनी सांगितले .
0 Response to "निशुल्क मुळव्याध - भगंदर तपासणी शिबीर"
Post a Comment