शासन किती दिवस कलावंताचा छळ करणार ?
शासन किती दिवस कलावंताचा छळ करणार ?
पंधरा दिवसात वृद्ध साहित्यीक कलाकार समितीचे गठन न झाल्यास बेमुदत धरणे आंदोलन !
कारंजा: महाविकास आघाडी शासन आणि रयतेचे 'राजे' असलेले विद्यमान पालकमंत्री - ना.शंभूराजे देसाई यांनी जर वयोवृद्ध,आजारग्रस्त,अस्थिव्यंग, दिव्यांग उपासमारीने त्रस्त असलेल्या कलाकाराची दखल घेऊन,पंधरा दिवसाचे आत जर, जिल्हा परिषद समाज कल्याण अंतर्गत येणाऱ्या-"वृद्ध कलाकार साहित्यीक निवड समितीचे" गठन केलेच नाही.तर येत्या 15 एप्रिल 2022 पासून हजारो वयोवृद्ध - आजारग्रस्त -अस्थिव्यंग - दिव्यांग साहित्यीक, वाशिम येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर बेमुदत धरणे आंदोलनाला बसणार असल्याचा शेवटचा धरणे आंदोलनाचा इशारा, कारंजा [लाड] येथील, विदर्भ लोककलावंत संघटनेचे अध्यक्ष, महाराष्ट्र शासन पुरस्कारप्राप्त लोककलावंत संजय कडोळे यांनी महाविकास आघाडी शासनाला दिलेला असून त्यांनी तसे पत्र कारंजाचे पिठासिन निवासी ना .तहसिलदार राजेश ढोमडे यांचे मार्फत मा . उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री महाराष्ट्र शासन मुंबई, मा . अमितजी देशमुख, सांस्कृतिक मंत्री तथा मा . शंभूराजे देसाई यांना पाठविलेले आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, गेल्या अडिच वर्षापूर्वी पार पडलेल्या विधानसभा निवडणुकानंतर, महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार अस्तित्वात आलेले असून, रयतेचे राजे असलेल्या पश्चिम महाराष्ट्रातील लांबवरच्या गृहराज्यमंत्री ना . शंभूराजे देसाई यांना, वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून जिल्हयातील रयतेचे पालकत्व देण्यात आले . परंतु आज रोजी महाविकास आघाडीला शासनात सत्तेत येऊन अडीच वर्ष झालेली असतांनाही ना . शंभूराजे देसाई यांनी जिल्ह्यातील नियोजन समिती वगळता इतर एकाही शासकिय निमशासकिय समितीचे अद्यापपर्यंत गठनच केलेले नसल्यामुळे विकास कामाचा खोळंबा झालेला आहे . तसेच जिल्ह्यातील गरजू,वयोवृद्ध,दिव्यांग, अस्थिव्यंग यांनी गेल्या जवळ - जवळ पाच वर्षापासून मानधना करीता समाजकल्याण जिल्हा परिषदेकडे दिलेले प्रस्ताव मंजूर होऊ शकलेले नाहीत . सन २००० ते २०२२ अशा तिन वर्षाच्या जिल्हा वृद्ध साहित्यीक कलाकार निवड समितीच्या वार्षिक बैठकीच झाल्या नाहीत .त्यामुळे गरजू वयोवृद्ध साहित्यीक व कलाकारांची कुचंबना होत असून त्यांना प्रचंड उपासमारीला तोंड द्यावे लागत असल्याचे वास्तव आहे . त्यामुळे निदान आता तरी दि .15 एप्रिल 2022 पर्यंत सदरहु जिल्हा वृद्ध साहित्यीक समितीचे गठन होऊन मागील तिन वर्षाच्या बैठकी एकदाच घेऊन जिल्हयातील वयोवृद्ध साहित्यिक कलाकारांना मानधन मंजूर करून न्याय मिळवून द्यावा अन्यथा येत्या दि .15/04/2022 पासून विदर्भ लोककलावंत संघटनेकडून, जिल्हाधिकारी कार्यालयावर बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा इशारा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त लोककलावंत संजय कडोळे यांनी तसेच स्थानिक विदर्भ लोककलावंत संघटनेचे राजुभाऊ सोनोने, उमेश अनासाने, शेषराव पाटील इंगोले, कैलास हांडे पत्रकार दामोधर जोंधळेकर, विजय खंडार, महिला कलावंत - सौ इंदिराबाई मात्रे, श्रीमती कांताबाई लोखंडे इ कलावंतानी, आज दि.25 मार्च रोजी,पिठासिन निवासी तहसिलदार राजेश ढोमडे यांचे मार्फत मुख्यमंत्री, सांस्कृतिक मंत्री, पालकमंत्री यांना पाठवीलेल्या निवेदनात दिला आहे .
0 Response to "शासन किती दिवस कलावंताचा छळ करणार ?"
Post a Comment