-->

राज्यात उत्कृष्ट काम करणाऱ्या आशा वर्कर्सना 1 लाख प्रोत्साहनपर पारितोषिक - राजेश टोपे

राज्यात उत्कृष्ट काम करणाऱ्या आशा वर्कर्सना 1 लाख प्रोत्साहनपर पारितोषिक - राजेश टोपे


साप्ताहिक सागर आदित्य/

मुंबई - राज्यात उत्कृष्ट काम करणाऱ्या आशा स्वयंसेविकांना पहिले प्रोत्साहनपर पारितोषिक म्हणून १ लाख रूपये, द्वितीय ७५ हजार तर तिसरे पारितोषिक ५० हजार रूपये देण्यात येणार असल्याची घोषणा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज विधान परिषदेत केली. त्याचप्रमाणे जिल्ह्यात चांगले काम करणाऱ्या आशा स्वयंसेविकाना देण्यात येणाऱ्या प्रोत्साहनपर रकमेत वाढ करण्यात आली असून पहिल्या क्रमांकास ५० हजार रूपये दुसऱ्या क्रमांकाच्या आशा वर्करला ३० हजार देण्यात येतील. आशा स्वयंसेविकेस आदिवासी भागाकरिता ११ हजार रूपये तर बिगर आदिवासी भागाकरिता १० हजार रूपये रक्कम मिळावी, अशी त्यांच्या कामावर आधारित व्यवस्था आहे. आशा स्वयंसेविकांनी संप पुकारल्यानंतर त्यांच्या मानधनात १५०० रू व प्रवर्तक यांना १७०० रूपयांची वाढ केली होती. ती वाढीव सर्व १८० कोटी रूपयांची रक्कम मार्च अखेर देण्यात येईल, असे टोपे यांनी सांगितले. या संदर्भातील प्रश्न विधान परिषद सदस्य डॉ.प्रज्ञा सातव, सर्वश्री सदाशिव खोत, शशिकांत शिंदे यांनी उपस्थित केला होता.

 





0 Response to "राज्यात उत्कृष्ट काम करणाऱ्या आशा वर्कर्सना 1 लाख प्रोत्साहनपर पारितोषिक - राजेश टोपे"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article