
श्री पांडुरंग विद्यालयात नशा मुक्त भारत अभियान कार्यक्रम संपन्न
साप्ताहिक सागर आदित्य
श्री पांडुरंग विद्यालयात नशा मुक्त भारत अभियान कार्यक्रम संपन्न
पिंपळा:- श्री पांडुरंग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय,पिंपळा ता.मालेगाव येथे दि. २६ सप्टेंबर २०२२ रोजी `नशा मुक्त भारत अभियान' कार्यक्रम घेण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य आर.एन. देशमुख सर तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून कर्मयोगी बाबारावजी जोगदंड कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एन.जाधव सर तर प्रमुख पाहुणे म्हणून करंगामी सर हे होते.
या अभियाना अंतर्गत विद्यालयात निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा व चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धेमध्ये भाग घेऊन नशा मुक्त भारत अभियान यशस्वीपणे राबविला.
यावेळी मार्गदर्शक एस.एन. जाधव सर यांनी अंमली पदार्थाचे सेवन केल्याने काय दुष्परिणाम होतात याचे सखोल मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस. बी.देशमुख प्रास्ताविक एन.डी. भिंगे तर आभार प्रदर्शन जी.डी. कोरडे यांनी केले.
कार्यक्रमाला वर्ग ५ वी ते १२वीचे सर्व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.
0 Response to "श्री पांडुरंग विद्यालयात नशा मुक्त भारत अभियान कार्यक्रम संपन्न "
Post a Comment