-->

1ते 30 सप्टेंबर 2022 दरम्यान वाशिम नागरी प्रकल्पाच्या सर्व अंगणवाडी केंद्रांमधून पोषण उत्साहात

1ते 30 सप्टेंबर 2022 दरम्यान वाशिम नागरी प्रकल्पाच्या सर्व अंगणवाडी केंद्रांमधून पोषण उत्साहात

 


साप्ताहिक सागर आदित्य 

1ते 30 सप्टेंबर 2022 दरम्यान वाशिम नागरी प्रकल्पाच्या सर्व अंगणवाडी केंद्रांमधून पोषण उत्साहात साजरा करण्यात येत आहे या अंतर्गत दररोज अंगणवाडी केंद्रामध्ये विविध कार्यक्रम पोषण पंचायत ,महिला व स्वास्थ्य, पोषण आणि शिक्षण, स्थानिक पाककृतीतून अधिक पोषणमूल्य युक्त आहार घेणे, स्वस्थ बालक बालिका स्पर्धा, इत्यादी मुद्द्यांवर विशेष भर देऊन यावर्षी पोषण महा साजरा करण्यात आला. प्रत्येक अंगणवाडी केंद्रामध्ये सर्वेक्षित सर्व मुलांची व सर्वेक्षणाबाहेरील सहज शक्य तितक्या मुलांची वजन उंची घेऊन तसेच विहीत निकषांनुसार सहा महिने ते तीन वर्ष तीन ते सहा वर्ष वयोगटामधून एकेका सुदृढ बालकाची निवड करण्यात आली. या सुदृढ बालकांना घडविणाऱ्या सुजाण पालकांना 30 सप्टेंबरला सर्व अंगणवाडी केंद्रांमधून स्थानिक स्तरावर पोषण माह सांगता  कार्यक्रमांमध्ये सन्मानपत्र देण्यात येईल. तसेच अंगणवाडी केंद्राच्या परीक्षेत अंतर्गत येणाऱ्या सर्वच पालकांनी सुजाण बनून सुदृढ बालकांना घडवावे याकरिता अंगणवाडी सेविकांचे प्रयत्न अविरत सुरू आहेत. यामध्ये पालकांच्या संपूर्ण सहकार्याची आवश्यकता आहे. कारण सुजाण पालक सुदृढ बालक सक्षम देश घडवू शकतात.पोषण माह अंतर्गत दिनांक 27 सप्टेंबर 2022 रोजी अंगणवाडी केंद्र क्रमांक 80 ध्रुव शाळा येथे बीटस्तरीय पोषण माह कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये सर्व अंगणवाडी सेविका लाभार्थी पालक यांनी पाककृती स्पर्धेमध्ये भाग घेऊन बक्षिसे जिंकली. तसेच सुदृढ बालकांना भाजप महिला मुक्ती मोर्चा व माजी आमदार राजगुरू सर यांच्या  मार्फत खेळणी व पोषक आहार केळी  देऊन मुलांचा पालकांचा उत्साह वाढविण्यात आला.तसेच याप्रसंगी अंगणवाडी स्तरावर मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत राहणाऱ्या व नेहमी कार्यक्रमांमध्ये सहकार्य करणाऱ्या श्रीमती गोटे अंगणवाडी सेविका यांचा सत्कार करण्यात आला.

Related Posts

0 Response to "1ते 30 सप्टेंबर 2022 दरम्यान वाशिम नागरी प्रकल्पाच्या सर्व अंगणवाडी केंद्रांमधून पोषण उत्साहात "

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article