जागतिक पर्यावरणदिनानिमित्त नैसर्गिक शेती विषयी प्रशिक्षण व जनजागृती
साप्ताहिक सागर आदित्य
जागतिक पर्यावरणदिनानिमित्त नैसर्गिक शेती विषयी प्रशिक्षण व जनजागृती
वाशिम, मौजे अडोळी येथे आज ५ जून २०२४ रोजी आत्माच्या प्रकल्प संचालक अनिसा महाबळे यांच्या मार्गदर्शनात डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन अंतर्गत छत्रपती नैसर्गिक शेती शेतकरी गटाच्या माध्यमातून शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन जागतिक पर्यावरण दिनानिमित्त करण्यात आले.
या कार्यक्रमास मंडळ कृषी अधिकारी सुनील वाळूकर, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक जयप्रकाश लव्हाळे ,सर्ग विकास समितीचे प्रशिक्षक शिवाजी भारती, कृषी सहाय्यक महादेव सोळंके, राजेश ठाकरे, भागवत देशमुख, नागेश हातोलकर, बाळू इंगळे,व नैसर्गिक शेती गटाचे प्रमुख गजानन ईढोळे, गणेश ईढोळे तसेच गावातील शेतकरी उपस्थित होते.
कार्यक्रमांमध्ये सीपीपी युनिट तयार करणे तसेच विविध नैसर्गिक निविष्ठा तयार करणे व त्याचा वापर याविषयी शिवाजी भारती यांनी मार्गदर्शन केले.
नैसर्गिक शेतीची गरज व त्याकरता गायीचे महत्त्व याविषयी महादेव सोळंके यांनी मार्गदर्शन केले. तरल खत जीवामृत दशपर्णी अर्क याविषयी भागवत देशमुख यांनी मार्गदर्शन केले.
योजनेची व्याप्ती व शेतकऱ्यांनी याकरिता करावयाच्या उपाययोजना व योजना राबविण्याच्या दृष्टीने शेतकऱ्यांचा सहभाग वाढविण्याच्या दृष्टीने शेतकऱ्यांमध्ये लोकसहभागाची भावना निर्माण व्हावी याकरिता सर्वांनी एकत्रित येऊन काम करण्याचे आवाहन तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापन जयप्रकाश लव्हाळे यांनी यावेळी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नागेश हातोलकर, बाळू इंगळे, नैसर्गिक शेती गटाचे प्रमुख गजानन ईढोळे ,गणेश ईढोळे छत्रपती नैसर्गिक शेती शेतकरी गटाचे सदस्यांनी सहकार्य केले.
0 Response to "जागतिक पर्यावरणदिनानिमित्त नैसर्गिक शेती विषयी प्रशिक्षण व जनजागृती"
Post a Comment