-->

कर्मयोगी बाबारावजी जोगदंड कृषि महाविद्यालय, आमखेडा येथे महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी  साजरी

कर्मयोगी बाबारावजी जोगदंड कृषि महाविद्यालय, आमखेडा येथे महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी साजरी



साप्ताहिक सागर आदित्य 

कर्मयोगी बाबारावजी जोगदंड कृषि महाविद्यालय, आमखेडा येथे महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी  साजरी

कर्मयोगी बाबारावजी जोगदंड कृषि महाविद्यालय, आमखेडा येथे महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी  साजरी करण्यात आली. त्यावेळेस कार्यक्रमाचे अध्यक्ष कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एम. जाधव यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून पूजन करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तृतीय वर्षाचा विद्यार्थी चेतन खाडे यांनी केले तर  कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिवशंकर हरणे यांनी केले. तृतीय वर्षाची विद्यार्थिनी पूनम वाघमारे हिने आपले मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय भाषण डॉ. एस. एम. जाधव यांनी आपल्या भाषणातून महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विषयी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन रोशण बेलकेडे या विद्यार्थ्याने केले. 

      कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एस. एम. जाधव व राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. आर. एस. करंगामी यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम यशस्वीरित्या घेण्यात आला.

      त्यावेळेस कृषि महाविद्यालयाचे  प्रा. एस. बी. मनवर , प्रा. शशिकांत वाकुडकर प्रा. एम. सुरुशे,  प्राध्यापक वृंद व इतर कर्मचारी व विद्यार्थी _विद्यार्थिनी उपस्थित होते.

Related Posts

0 Response to "कर्मयोगी बाबारावजी जोगदंड कृषि महाविद्यालय, आमखेडा येथे महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी साजरी"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article