दुबळवेल येथील जिर्ण झालेली पाण्याची टाकी तातडीने पाडावी
साप्ताहिक सागर आदित्य/
दुबळवेल येथील जिर्ण झालेली पाण्याची टाकी तातडीने पाडावीमालेगाव तालुका काँग्रेस सेवादल अध्यक्ष भगवानराव देवढे यांचे कार्यकारी अभियंता यांना निवेदन
सरपंचाचेही निवेदन दुबळवेल येथील जिर्ण पाण्याची टाकी तातडीने पाडण्यात यावी याबाबात दुबळवेल ग्रामपंचायत सरपंच कोमल वाघमारे यांच्यासह अभियंता यांना पत्र दिले.
मालेगाव- दुबळवेल येथील अतिशय जिर्ण झालेली पाण्याची टाकी तातडीने पाडण्यात यावी अशी मागणी मालेगाव तालुका काँग्रेस सेवादल अध्यक्ष भगवानराव देवढे यांनी केली असुन पाण्याची टाकी पाडण्यात यावी नाहीतर जीवीत हाणी होण्याची शक्यताही कार्यकारी अभियंता जीवन प्राधीकरण कार्यालय वाशिम यांना दिलेल्या पत्रातुन केली आहे. २१ गाव दुधखेडा पाणी पुरवठा योजने अंतर्गत दुबळवेल येथे पाणी पुरवठा नळ योजनेची पाण्याची टाकी असुन ही पाण्याची टाकी २५ ते ३० वर्षाची जुनी असुन अतिशय जिर्ण झाली आहे. या पाण्याच्या टाकीजवळ जिल्हा परिषद शाळा असुन पाण्याची टाकी जवळ गोपाळवस्ती असुन या ठिकाणी लहान मुले खेळतात त्यामुळे अतिशय जुनी व जिर्ण झालेली पाण्याची टाकी ही पाडणे आवश्यक झाली आहे . ही पाण्याची टाकी ही पाडणे आवश्यक झाली आहे . ही पाण्याची टाकी नळयोजना बंद असल्याने काहीच कामाची नाही . त्यामुळे कामाची नसलेली पाण्याची टाकी एखाद्या दिवसी कोसळल्यास याठिकाणी जिवीत हाणी होण्याची शक्यता आहे . तरी दुबळवेल येथिल जिर्ण पाण्याची टाकी तातडीने पाडण्यात यावी अशी मागणी कॉंग्रेस सेवादल मालेगाव तालुका अध्यक्ष भगवानराव देवढे यांनी केली आहे . तर याबाबत कार्यकारी अभियंता जीवन प्राधिकरण विभाग वाशिम यांना निवेदन दिले.
0 Response to "दुबळवेल येथील जिर्ण झालेली पाण्याची टाकी तातडीने पाडावी"
Post a Comment