-->

आमखेडा कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे सुयश

आमखेडा कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे सुयश


साप्ताहिक सागर आदित्य/

आमखेडा कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे सुयश

आमखेडा: महाराष्ट्र राज्य कृषी संशोधन व शिक्षण परिषद पुणे यांच्यामार्फत कृषि पदव्युत्तर पदवी प्रवेशासाठी राज्यस्तरीय पूर्व प्रवेश परीक्षा ऑगस्ट २०२१ मध्ये घेण्यात आली होती. या परीक्षेमध्ये डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ अकोला संलग्नित, गीताई ह्यूमनकाईंड डेव्हलपमेंट ट्रस्ट, पुणे द्वारा संचालित कर्मयोगी बाबारावजी जोगदंड कृषि महाविद्यालय (अहिंसातिर्थ)आमखेडा येथील पाच विद्यार्थ्यांनी पदव्युत्तर पदवीला प्रवेश मिळविला. त्यामध्ये अजय रिडे, सौरभ  साबळे, कु. शुभांगी कळसकर यांनी पदव्युत्तर शिक्षण संस्था, अकोला व अजय रिंडे , व आशीष खटारे यांनी कृषि महाविद्यालय पुणे व लातूर येथे प्रवेश मिळविला आहे.

या सर्व विद्यार्थ्यांना गी. ह्यु. डे. ट्रस्ट, चे  मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश जोगदंड, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एम. जाधव, प्रा. पी. टी. निचळ. प्रा. एस.  टी. कव्हर व सर्व प्राध्यापक वृंदांचे मार्गदर्शन लाभले.






0 Response to "आमखेडा कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे सुयश"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article