-->

पत्रकार दिनानिमित्त ब्रह्माकुमारीज विद्यालयाच्या मीडिया विंगच्या वतीने पत्रकारांचा सत्कार

पत्रकार दिनानिमित्त ब्रह्माकुमारीज विद्यालयाच्या मीडिया विंगच्या वतीने पत्रकारांचा सत्कार


साप्ताहिक सागर आदित्य/

पत्रकार दिनानिमित्त ब्रह्माकुमारीज विद्यालयाच्या मीडिया विंगच्या वतीने पत्रकारांचा सत्कार

रिसोड :- स्थानिक सिव्हिल लाईन स्थित प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयात ब्रह्मा कुमारीज मीडिया विभागाच्या वतीने आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त तालुक्यातील पत्रकार बांधवांचा यथोचित सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ब्रह्माकुमारीज रिसोड सेवा केंद्राच्या संचालिका आदरणीय राजयोगिनी ब्रह्माकुमारी ज्योती दिदी तर प्रमुख उपस्थिती प्रतिष्ठित व्यापारी भारतअप्पा जिरवणकर ,रमनलाल कोठारी, सहसंचालिका ब्रह्माकुमारी गीता दिदी इत्यादी मान्यवर उपस्थित होते. ईश्वराच्या स्मरणाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.उपस्थित पत्रकार बांधवांना ब्रह्माकुमारीज विद्यालयाचा परिचय ब्रह्माकुमारी गीता  दीदींनी दिला.नंतर उपस्थित सर्व पत्रकार बांधवांचा ब्रह्माकुमारी ज्योती दिदी व मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.ज्योती दीदींनी मनोगत व्यक्त करताना पत्रकार हा सकारात्मक समाज निर्मितीसाठी महत्वपूर्ण जबाबदार घटक आहे.वेळेनुसार समाजात अनेक बदल घडून येतात समाज हा सातत्याने परिवर्तनशील आहे परंतु समाजात होणारा बदल हा मीडियाच्या भूमिकेवर अवलंबून असतो म्हणून मीडियाने समाजात सकारात्मक विचारांचे बीजारोपण करून सशक्त समाज घडवण्यासाठी मानवी मूल्यांच्या विकासाला प्राधान्य द्यावे.ब्रह्माकुमारीज विद्यालयाचा मीडिया विभाग हा पत्रकारांच्या चांगल्या जीवनशैली सह दैवी गुण व सकारात्मक दृष्टिकोन व सामाजिक सदभावना वृद्धिंगत करण्यासाठी विविध उपक्रमाद्वारे प्रयत्नशील आहे.दीदींनी सर्व पत्रकारांना नवीन वर्षाच्या व पत्रकार दिनाच्या सर्वांना शुभेच्या दिल्या. प्रसंगी

ज्येष्ठ पत्रकार शंकरराव हजारे, संतोष वाघमारे ,पी डी पाटील, विवेकानंद ठाकरे, गजानन बानोरे,अर्जुन पाटील खरात,सतीश मांदळे, ताराचंद वर्मा, सुरेश गिरी,राहुल जुमडे, महादेव घुगे,प्रा रवि अंभोरे, रुपेश बाजड ,महेंद्र महाजन,गजानन हजारे, शंकर सदार ,फयाज भाई, शेख अन्सार,नाजीम भाई,

युवराज देशमुख, रंजीतसिंग ठाकूर, गजानन गाडे,उद्धवराव जटाळे,

दत्ता इंगळे, बंटी देगावकर , देशमुख,काशिनाथ कोकाटे, गजानन साळेगावकर,गजानन वाघ,प्रा विजयराव देशमुख इत्यादी पत्रकारांचा सन्मान करण्यात आला.सत्काराबद्दल पत्रकार संदीप देशमुख, गजानन बानोरे,संतोष वाघमारे, रमनलाल कोठारी यांनी मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार मीडिया विंग चे सदस्य तथा पत्रकार रवि अंभोरे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयाच्या ज्ञानार्थीनी विशेष परिश्रम घेतले.





0 Response to "पत्रकार दिनानिमित्त ब्रह्माकुमारीज विद्यालयाच्या मीडिया विंगच्या वतीने पत्रकारांचा सत्कार"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article