-->

अ.भा.मराठी पत्रकार परिषदेच्या शिरपुर अध्यक्ष पदी गजानन देशमुख

अ.भा.मराठी पत्रकार परिषदेच्या शिरपुर अध्यक्ष पदी गजानन देशमुख

 


साप्ताहिक सागर आदित्य/

अ.भा.मराठी पत्रकार परिषदेच्या शिरपुर अध्यक्ष पदी गजानन देशमुख

शिरपूर - मराठी पत्रकार दिनाचे औचित्य साधत पार पडलेल्या  कार्यक्रमांमध्ये अ. भा. मराठी पत्रकार परिषदेच्या शिरपूर कार्यकारणी चे नव्याने पुनर्गठन करण्यात आले.

6 जानेवारी हा मराठी पत्रकार दिन साजरा करण्यात येतो .अ. भारतीय मराठी पत्रकार परिषद शिरपूर शाखेच्यावतीने पत्रकार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. व यावेळी शिरपूरच्या कार्यकारिणीचे नव्याने पुनर्गठन करण्यात आले .शिरपुर अध्यक्षपदी गजानन देशमुख  उपाध्यक्षपदी सुलतान शेख तर सचिव पदी कपील भालेराव यांची एकमताने निवड करण्यात आली

    .यावेळी संघटनेचे नवनिर्वाचित अध्यक्ष , यानी सर्वांना सोबत घेऊन एकमताने एकदिलाने भविष्यात वाटचाल करू असे बोलतांना  सांगितले .यावेळी ज्येष्ठ मार्गदर्शक कैलास भालेराव ,शशिकांत देशमुख, असलम शेख पठाण तसेच गोपाल वाढे ,संदीप देशमुख ,किशोर  जाधव यांची उपस्थिती होती. तसेच पत्रकार दिनानिमित्त पोलीस स्टेशन , दिगंबर जैन संस्थान,तसेच डॉ. प्रशांत देशमुख मित्र मंडळ यांच्या वतीने सर्व पत्रकारांचा यथोचित सत्कार करण्यात आला.





0 Response to "अ.भा.मराठी पत्रकार परिषदेच्या शिरपुर अध्यक्ष पदी गजानन देशमुख"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article