-->

जोगदंड कृषि महाविद्यालयात ब्रह्माकुमारीज कडून शाश्वत यौगिक शेतीचे प्रात्यक्षिक

जोगदंड कृषि महाविद्यालयात ब्रह्माकुमारीज कडून शाश्वत यौगिक शेतीचे प्रात्यक्षिक

 


साप्ताहिक सागर आदित्य/
जोगदंड कृषि महाविद्यालयात  ब्रह्माकुमारीज कडून शाश्वत यौगिक शेतीचे प्रात्यक्षिक

ब्रह्माकुमारी ज्योती दिदी व स्नेहलता दीदींनी केले मार्गदर्शन 

वाशिम:- मालेगाव तालुक्यातील आमखेड स्थित कर्मयोगी बाबरावजी जोगदंड कृषी महाविद्यालयात  राष्ट्रीय किसान दिवसाच्या निमित्ताने विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गीताई ह्युमनकाइंड डेव्हलपमेंट पुणे द्वारा संचालित कर्मयोगी बाबारावजी जोगदंड कृषी महाविद्यालयाचे संचालक अविनाश जोगदंड,कार्यक्रमाचे उदघाटक प्रा रवि अंभोरे, रिसोड,प्रमुख मार्गदर्शिका ब्राह्मकुमारीज सेवा केंद्र रिसोड संचालिका राजयोगिनी ब्रह्माकुमारी ज्योती दिदी,ब्राह्मकुमारीज सेवा केंद्र मालेगाव संचालिका राजयोगिनी ब्राह्मकुमारी स्नेहलता दिदी तर प्रमुख उपस्थिती डॉ माणिकराव जोगदंड व मनोरमा ताई जोगदंड इत्यादी मान्यवर उपस्थित होते.अतिशय दुर्गम आणि ग्रामीण भागात निसर्गरम्य वातावरणात  अतिशय विस्तारित क्षेत्रावर नियोजनबद्ध व सकारात्मक विचारांच्या प्रकंपनातून विकसित झालेल्या कृषी महाविद्यालयात राजयोगिनी ब्रह्माकुमारी ज्योती दिदी व राजयोगिनी ब्रह्माकुमारी स्नेहलता दिदी यांनी कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना शाश्वत यौगिक शेतीविषयक मार्गदर्शन केले तर प्रत्यक्ष पिकांशी योग कसा लावावा याचे प्रात्यक्षिक ब्राह्मकुमारी ज्योती दीदींनी केले. कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य,कर्मचारी व सर्व विद्यार्थ्यांनी शाश्वत यौगिक शेती प्रात्यक्षिकाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.कृषी महाविद्यालयातील विद्यार्थी हे शेतकऱ्यांचे खरे मार्गदर्शक व मित्र आहेत शेतकरी आपल्या शेतीला आईचा दर्जा देऊन तिची देखभाल करतात परंतु इच्छा नसतानाही योग्य ज्ञान व मार्गदर्शन अभावी शेतकरी रासायनिक शेतीकडे वळले आहेत परंतु रासायनिक शेतीचे अनेक दुष्परिणाम समोर येत असतांना आता जैविक शेतीची संकल्पना मोठ्या प्रमाणात प्रत्यक्षात येत आहे त्यासोबतच ब्राह्मकुमारीज च्या कृषी व ग्रामविकास प्रभागा द्वारे शाश्वत यौगिक शेतीचा प्रचार आणि प्रसार करण्याचा महत्वपूर्ण कार्यक्रम संपूर्ण भारत भर राबविण्यात येत आहे आणि जैविक व यौगिक शेती ही व आरोग्यासाठी करणे ही काळाची गरज  असल्याचे प्रतिपादन ब्राह्मकुमारी स्नेहलता दीदींनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले.महाविद्यालयाचे संचालक अविनाश जोगदंड यांनी कृषी महाविद्यालयात सुरू असलेल्या विविध उपक्रमाची माहिती दिली व महाविद्यालयात शाश्वत यौगिक शेती करण्यासाठी काही ठराविक क्षेत्र राखीव ठेवून यौगिक शेतीला प्रोत्साहन  देऊन शेतकऱ्यांना याविषयी अवगत करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्याचे आश्वासन दिले.प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते काही शेतकऱ्यांना सन्मानित करन्यात आले.कार्यक्रमाला कृषी महाविद्यालयाचे कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

0 Response to "जोगदंड कृषि महाविद्यालयात ब्रह्माकुमारीज कडून शाश्वत यौगिक शेतीचे प्रात्यक्षिक"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article