-->

वसंतराव नाईक विद्यालय मानोरा येथे "सन्मान महाराष्ट्राच्या लेकीचा" कार्यक्रम

वसंतराव नाईक विद्यालय मानोरा येथे "सन्मान महाराष्ट्राच्या लेकीचा" कार्यक्रम

 


साप्ताहिक सागर आदित्य/

वसंतराव नाईक विद्यालय मानोरा येथे "सन्मान महाराष्ट्राच्या लेकीचा" कार्यक्रम 

मानोरा :- स्थानिक वसंतराव नाईक विद्यालयामध्ये ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त आयोजित कार्यक्रम सन्मान महाराष्ट्राच्या लेकीचा या अभियानंतर्गत "वेशभूषा" स्पर्धा आयोजित केली असता कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी शाळेच्या शिक्षिका कु.सविता भालेराव तर प्रमुख अतिथी म्हणून कोविड १९ मध्ये अविरत सेवा देणाऱ्या आरोग्य विभागाच्या परिचारिका शिलाताई खाडे या होत्या. त्या प्रसंगी सावित्रीबाईंच्या प्रतिमेचे पूजन श्रीमती शीलाताई खाडे मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले आणि त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून त्यांच्या सत्कार शाळेच्या सहशिक्षिका सरोज सोळंके मॅडम यांच्या हस्ते करण्यात आला.  रामराव पाटील यांनी स्वागत गीत गाऊन अतिथी चे स्वागत केले. प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक प्रसेन भगत यांनी केले.

त्या नंतर झालेल्या वेशभूषा कार्यक्रमात सावित्री बाईच्या भूमिकेत "मी सावित्री बोलते" हे एकपात्री नाटिका वर्ग १० ची विद्यार्थिनी कू समीक्षा सोनोने हिने सादर केले.त्याच प्रमाणे वर्ग १० च्या कू.प्रगती मात्रे, कू संध्या साबळे, कू मयुरी सोनटक्के. वर्ग ९वी मधून कू स्वाती मनवर, वर्ग ८ वी मधून कू आयुषी मनवर, खुशी मोहाळे कू श्रेया भगत, इयत्ता ५ ते ७वी मधून कू भाग्यश्री देवकर, कू लावण्या भवाळ , कू जानवी सोनोणे , श्वेता हम्बरे, राधा बोचाट, साक्षी आठवले, नंदिनी कलापड , आचल बावणे , कोमल सोनोने, पूजा सोनोने , समीक्षा अडुळे, नयना वानखेडे, मिताली भगत, राजश्री खाडे, आचल खाडे इत्यादी मुलींनी सहभाग नोंदविला व सावित्रीबाईंच्या विचारला अभिवादन केले.

कार्यक्रमाला शाळेचे शिक्षक अनंत खडसे, सतीश भगत, चंद्रशेखर वानखेडे, रुपेश जयस्वाल , निलेश उजवे , वैशाली चातुरकर, विजयश्री सरनाईक, ज्योती इंगोले ,सरोज सोळंके इत्यादी कर्मचारी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कू मयुरी सोनटक्के हिने तर आभार प्रदर्शन कू संध्या साबळे हिने केले. समारोप प्रसंगी सर्व विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले.






0 Response to "वसंतराव नाईक विद्यालय मानोरा येथे "सन्मान महाराष्ट्राच्या लेकीचा" कार्यक्रम "

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article