
रक्तदान शिबिराचे आयोजन करून केकतउमरा वासियांनी महात्मा फुले यांना केले अभिवादन... ५१ दात्यांनी केले रक्तदान
साप्ताहिक सागर आदित्य
रक्तदान शिबिराचे आयोजन करून केकतउमरा वासियांनी महात्मा फुले यांना केले अभिवादन...
५१ दात्यांनी केले रक्तदान
केकतउमरा : क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त स्थानिक केकतउमरा येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक सभागृहात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. रक्तदान शिबीराच्या उद्घाटन प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा.सरपंच राजाराम पट्टेबहादुर हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून वाशीम येथील प्रसिद्ध बालरोग तज्ञ डॉ.विजयराव कानडे, मा.सरपंच तुकाराम वाशिमकर, सामाजिक कार्यकर्ते टी.डी.पट्टेबहादुर,पं. स. सदस्य वसंता पुंड, उपसरपंच नागनाथ वाठ, राजू नेहुल,दत्ता पट्टेबहादुर ,डॉ.तोडकरसहेब,ग्रामपंचायतचे सदस्य गण उपस्थित होते. सर्वप्रथम क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले,डॉ.बाबासाहेब आंबेडकर,छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले.सर्वांचे शब्द सुमनाने स्वागत करण्यात आले.याप्रसंगी बोलतांना डॉ कानडे साहेब यांनी शिक्षण,संस्कार,व्यसन ,स्पर्धा परीक्षा याबाबत सर्व ज्येष्ठांनी पुढाकार घेऊन जनजागृती करावी असे आवाहन केले.महात्मा फुले यांचे विचार आचरणात आणले तरच त्यांना खरी श्रद्धांजली होईल असेही पुढे म्हणाले.अध्यक्षीय भाषणात राजाराम पट्टेबहादुर यांनी सामाजिक समता प्रस्थापित करण्यासाठी महात्मा फुले यांच्यासह डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी आपले जीवन खर्ची घातले असे सांगितले.माळी समाज सेवा संघ,समस्त गावकरी,महात्मा फुले ब्लड डोनर ग्रुप,वाशीम ब्लड बँक यांच्या संयुक्त विद्यमाने या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.याकामी डॉ.दीपक तडस,डॉ.गणेश तडस,डॉ.राधेश्याम वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली तरुणांनी अथक परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे संचालन संभाजी साळसुंदर सर यांनी केले तर आभार प्रदर्शन वैभव वाठ यांनी केले.यावेळी गावातील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.
0 Response to "रक्तदान शिबिराचे आयोजन करून केकतउमरा वासियांनी महात्मा फुले यांना केले अभिवादन... ५१ दात्यांनी केले रक्तदान"
Post a Comment