जागतिक पर्यावरण दिनानिमित्त जिल्हा न्यायालयात वृक्षारोपण
साप्ताहिक सागर आदित्य
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त जिल्हा न्यायालयात वृक्षारोपण
वाशिम,
जिल्हा विधि सेवा प्राधिकरण, जिल्हा विधिज्ञ संघ, वाशिम यांच्या संयुक्त विद्यमाने ५ जुन २०२४ रोजी जागतिक पर्यावरण दिनाच्या अनुषंगाने वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
जिल्हा व सत्र न्यायाधीश एन. आर. प्रधान यांचे हस्ते जिल्हा विधि सेवा प्राधिकरण, जिल्हा न्यायालय परिसरामध्ये वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी जिल्हा विधि सेवा प्राधिकरणाचे सचिव व्ही. ए.टेकवाणी, मुख्य न्यायदंडाधिकारी एस. एस. उबाळे, २ रे सह दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर एम. टी. ठवरे,२ रे सहदिवाणी न्यायाधीश क. स्तर तथा न्यायदंडाधिकारी प्रथमवर्ग एस. एस. पदवाड, के. डी.
लुकडे, अतिरिक्त दिवाणी न्यायाधीश क. स्तर तथा न्यायदंडाधिकारी प्रथमवर्ग
वाशिम, ऍड. अनुप बाकलीवाल, अध्यक्ष जिल्हा विधिज्ञ संघ, वाशिम, ऍड. परमेश्वर शेळके, मुख्य लोक अभिरक्षक, वाशिम, ऍड. अभिजीत व्यवहारे, सरकारी, अभियोक्ता, जी. बी. नांदेकर, प्रबंधक जिल्हा न्यायालय वाशिम तसेच जिल्हा विधिज्ञ संघाचे सदस्य, लोक अभिरक्षक, न्यायालयीक कर्मचारी, जिल्हा विधि सेवा प्राधिकरण वाशिमचे कर्मचारी, विधि स्वयंसेवक यांची उपस्थिती लाभली.
0 Response to "जागतिक पर्यावरण दिनानिमित्त जिल्हा न्यायालयात वृक्षारोपण"
Post a Comment