-->

जिल्हा परिषद प्राथ.शाळा घाटा प.स.मालेगाव येथे इयत्ता ८ वी तील विद्यार्थ्यांना निरोप

जिल्हा परिषद प्राथ.शाळा घाटा प.स.मालेगाव येथे इयत्ता ८ वी तील विद्यार्थ्यांना निरोप

 


साप्ताहिक सागर आदित्य 

जिल्हा परिषद प्राथ.शाळा घाटा प.स.मालेगाव येथे इयत्ता ८ वी तील विद्यार्थ्यांना निरोप

पहिले पाऊल टाकून ८ वर्ष ज्या शाळेत घडले,शिकले अशा इयत्ता ८ वी मधील पाखरांना सर्व शिक्षकवृंद आणि १ ते ७ च्या विद्यार्थ्यांच्या वतीने निरोप देण्यात आला .कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावाचे सरपंच प्रकाश पाटील सोमटकर हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष मदन दाभाडे,सदस्य पांडुरंग पाटील,गजानन दाभाडे,संतोष कान्हेड,सुर्वे ,सीताराम दाभाडे हे उपस्थित होते.सर्व प्रथम क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांच्या  प्रतिमेचे पूजन अध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते करण्यात आले.नंतर सर्व पाहुण्याचे पुष्प गुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. इयत्ता ८ वी मधील सर्व विद्यार्थ्याचे  सुद्धा पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.  भावी यशस्वी जीवनासाठी शुभेच्छा देतांना - ध्येय - शैक्षणीक वाटचाल करत असतांना वर्तणूक व आचरण - मित्र मैत्री टिकवणे याबाबत मार्गदर्शन शाळेचे मुख्याध्यापक संभाजी साळसुंदर  यांनी केले. विद्यार्थ्यांशी हितगुज करतांना श्री तुकाराम इंगळे सर - श्री विठ्ठल कालवे  सर -श्री संमती पंचवाटकर सर यांनी पुढे खूप शिकून आईवडील,शाळा,गाव,शिक्षकाचे नाव उज्ज्वल करा अशा शुभेच्छा दिल्या . इयत्ता ८ वी मधील मानसी दाभाडे,अजय दाभाडे,अक्षय दाभाडे,नम्रता दाभाडे,कोमल दाभाडे विद्या गुडेकर ओम गुंजकर,निकिता गुंजकर या विद्यार्थांनी आपल्या  मनोगतातून आपले शिक्षक यांच्या बद्दल कृतज्ञता व्यक्त करत शाळेतील अनुभव कथन केले . मनोगतानंतर सत्यभामा मावशी आणि वंदनाबाई यांनी बनवलेल्या रुचकर फराळाचे वाटप करण्यात आले.कार्यक्रमाचे संचलन इयत्ता ७ वी मधील विद्यार्थिनी उजमा राजिक खान बेलदार हिने केले तर आभार कृष्णा गुंजकर याने मानले.

Related Posts

0 Response to "जिल्हा परिषद प्राथ.शाळा घाटा प.स.मालेगाव येथे इयत्ता ८ वी तील विद्यार्थ्यांना निरोप"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article