
भारत मातेचे वीर पुत्र क्रांतिवीर भगतसिंग यांच्या जयंती निमित्त
साप्ताहिक सागर आदित्य
भारत मातेचे वीर पुत्र क्रांतिवीर भगतसिंग यांच्या जयंती निमित्त सामाजिक कार्यकर्ते गोपाल भिसडे यांनी केला पुस्तके वाटप..
देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपले जीवन समर्पित करणारे भारत मातेचे वीर पुत्र क्रांतिवीर भगतसिंग यांच्या जयंती निमित्ताने सामाजिक कार्यकर्ते गोपाल भिसडे यांनी जिल्हा परिषद शाळा कोयाळी ( बु ) येथील विद्यार्थ्यांना शिवचरित्र, भीम चरित्र, शहीद ए आजम, बोधकथा, सुविचार, विविध गोष्टी, पुस्तकांचा वाटप केला,व शहिद क्रांतिवीर भगत सिंग यांनी इंग्रजांना हाकलून लावण्यासाठी हसत मुखाने फासावर जाऊन देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले, ते स्वातंत्र्य टिकवण्यासाठी काम करणे हे लोकशाहीवर विश्वास असणाऱ्या प्रत्येक भारतीयांचे कर्तव्य आहे लहान विद्यार्थ्यांना वीर भगतसिंग यांच्या बालवयातील गोष्टी देशासाठी केलेले बलिदान विद्यार्थ्यांना सांगितले, यावेळी जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक, घोडे सर,सावले सर, शिरसाठ मॅडम, भगवान भिसडे ( ग्रा. पं सदस्य ) ज्ञानेश्वर भिसडे उपस्थित होते,,
0 Response to "भारत मातेचे वीर पुत्र क्रांतिवीर भगतसिंग यांच्या जयंती निमित्त "
Post a Comment