
सेवा पंधरवडा दरम्यान स्वाधारच्या 103 अर्जातील त्रृटीची पुर्तता
साप्ताहिक सागर आदित्य
सेवा पंधरवडा दरम्यान
स्वाधारच्या 103 अर्जातील त्रृटीची पुर्तता
वाशिम, : राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर दरम्यान साजरा करण्यात येत आहे. या निमित्ताने सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, वाशिम यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेतील सन 2020-21 आणि सन 2021-22 मधील 173 अर्ज त्रृटी पुर्ततेसाठी प्राप्त झाले. या अर्जादार विद्यार्थ्यांशी संपर्क करुन 27 ते 29 सप्टेंबर रोजी 103 विद्यार्थ्यांच्या त्रृटी अर्जातील पुर्तता करुन अर्ज पात्र करण्यात आले. सन 2020-21 आणि सन 2021-22 मधील पात्र 2065 विद्यार्थ्यांपैकी 1583 विद्यार्थ्यांना 4 कोटी 2 लक्ष 19 हजार इतका निधी वाटप करण्यात आला. सद्यस्थितीत स्वाधार योजनेकरीता पात्र असलेल्या परंतू लाभ न मिळालेल्या एकूण 799 विद्यार्थ्यांकरीता 3 कोटी 93 लक्ष 68 हजार इतक्या निधीची मागणी वरिष्ठ कार्यालयाला करण्यात आली आहे. स्वाधार योजनेकरीता निधी प्राप्त होताच विद्यार्थ्यांना लाभाची रक्कम अदा करणार असल्याची माहिती समाज कल्याणचे सहायक आयुक्त मारोती वाठ यांनी दिली.
0 Response to "सेवा पंधरवडा दरम्यान स्वाधारच्या 103 अर्जातील त्रृटीची पुर्तता"
Post a Comment