-->

नळजोडणीची कामे सुरु न करणाऱ्या 10 ग्रामसेवकांना कारणे दाखवा नोटीसमुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत यांचा ईशारा

नळजोडणीची कामे सुरु न करणाऱ्या 10 ग्रामसेवकांना कारणे दाखवा नोटीसमुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत यांचा ईशारा

 


साप्ताहिक सागर आदित्य/

जल जीवन मिशनच्या कामात दिरंगाई खपवुन घेणार नाही!


मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत यांचा ईशारा


नळजोडणीची कामे सुरु न करणाऱ्या 10 ग्रामसेवकांना कारणे दाखवा नोटीस


वाशिम, दि: डिसें.1


जल जीवन मिशनच्या कामात दिरंगाई खपवुन घेतली जाणार नाही असा ईशारा जिल्हा परिषदच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत यांनी ग्रामसेवकांच्या बैठकित दिला. ग्राम स्तरावर घरगुती नळ जोडणी, शाळा- अंगणवाडी नळ जोडणी कामाचा आढावा घेण्यासाठी तालुका निहाय बैठकांचे आयोजन करण्यात आले. पहिली बैठक रिसोड तालुक्यातील ग्रामसेवकांची घेण्यात आली. या कामात मागे असलेल्या 10 ग्रामसेवकांना या सभेमध्येच कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली.


जिल्ह्यातील ग्राम पंचायतीमध्ये जल जीवन मिशन आणि 15 व्या वित्त आयोगाच्या निधीमधुन पाणी पुरवठा योजनेची दुरुस्ती करुन घरगुती नळ जोडणीचे व शाळा- अंगणवाडी यांना नळ जोडणी देण्याची कामे प्रलंबित आहेत. याबाबत पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव हे 10 डिसेंबर रोजी अमरावती विभागाचा आढावा घेणार आहेत.


जल जीवन मिशनच्या कामात समाधानकारक प्रगती नसल्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत यांनी कठोर भुमिका घेत तालुकानिहाय बैठकांचा धडाका लावला आहे. या बैठकीत गावनिहाय कामाचा आढावा घेण्यात येत आहे. दिनांक 1 डिसेंबर रोजी सकाळच्या सत्रात रिसोड तालुक्यातील ग्राम विकास अधिकारी आणि ग्राम  विकास अधिकारी तसेच शाखा अभियंता व विस्तार अधिकारी यांची बैठक घेऊन चांगलीच कान उघडणी केली. नळ जोडणीचे कामे पुर्ण झाले मात्र ऑन लाईन एन्ट्री बाकी आहे अशा ग्रामसेवकांना सभागृहात ऑन दि स्पॉट एन्ट्री मारण्याचे निर्देश दिले. यावेळी संबंधित ग्रामसेवकांकडुन ग्राम पंचायत स्तरावरुन  संगणक परिचालकामार्फत आवश्यक दस्ताएवज मागविण्यात आले. ऑन लाईन एन्ट्री झाल्याची खात्री स्वत: करणार असल्याचे यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी पंत म्हणाल्या.


*10 ग्रामसेवकांना ऑन दि स्पॉट कारणे दाखवा…*


नळ जोडणीच्या कामांची जुलै- ऑगष्ट महिन्यामध्येच प्रशासकीय व तांत्रिक मान्यता मिळाली असतांना अजुन पर्यंत काम सुरु न केल्यामुळे रिसोड तालुक्यातील 10 ग्रामसेवकांना सभागृहातच कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. ही ऑन दि स्पॉट कारवाई करण्यासाठी सभागृहातच संगणक व प्रिंटरची व्यवस्था करण्यात आली होती. तसेच लेखाविषयक बाबींच्या शंका निरसनासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी  तुषार मोरे यांना सभागृहात बोलावण्यात आले होते.


जल जीवन मिशनच्या कामाचा विस्तार अधिकारी यांनी दर 5 दिवसांनी, गट विकास अधिकारी यांनी दर 8 दिवसांनी व जिल्हा परिषद स्तरावर दर 15 दिवसांनी आढावा घेण्याच्या सुचना मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत यांनी संबंधितांना दिल्या. बैठकिला पंचायत विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक बोंद्रे, जिल्हा पाणी व स्वच्छता विभागाचे प्रकल्प संचालक गजानन वेले, महिला व बाल कल्याण विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी संजय जोल्हे, ग्रामिण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अतुल साळुंखे यांची उपस्थिती होती.



0 Response to "नळजोडणीची कामे सुरु न करणाऱ्या 10 ग्रामसेवकांना कारणे दाखवा नोटीसमुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत यांचा ईशारा "

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article